नंदेश्वर (प्रतिनिधी) – सर्वसामान्य शेतकरी, नागरिकांच्या लोकहितावह असणाऱ्या प्रश्नांसंदर्भात मंगळवेढा तालुक्यातील शासकीय अधिकाऱ्यांनी तसेच कर्मचाऱ्यांनी कसलीही हयगय करू नये असा आदेश नुकताच आ.समाधान आवताडे यांनी दिला आहे. आ.आवताडे यांच्या या आदेशाचे पालन न केल्यास व सर्वसामान्यांच्या विकासाच्या आड आल्यास शासकीय अधिकाऱ्यांची तसेच कर्मचाऱ्यांची आ.आवताडे यांच्या मी व माझ्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांशी गाठ आहे असा इशारा आ. समाधान आवताडे यांचे खंदे समर्थक तथा शेतकरी नेते आकाश डांगे यांनी दिला आहे.
चार दिवसापूर्वी आमदार समाधान आवताडे यांनी सर्व शासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यामध्ये सर्व अधिकाऱ्यांना विनंती करून लोकहितावह असणाऱ्या सर्व योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यास सांगितले, आणि शेतकरी बांधवांची कुठलीही आर्थिक पिळवणूक होऊ नये याचीही काळजी घेण्यास सांगितली आहे. सर्वसामान्य लोकांना शासकीय कार्यालयामध्ये आर्थिक बाबींची मागणी केली जाते पण इथून पुढे अशा प्रकारची कल्पना कर्मचाऱ्यांनी डोक्यातून काढून टाकाव हे सरकार महायुतीचं आहे आणि या तालुक्याचे आमदार निष्कलंक, निस्वार्थी वृत्तीच आहेत जनतेने त्यांना निस्वार्थपणे त्यांची मतं पारड्यात टाकले आहेत. त्यांची सेवा करण्यासाठी म्हणून येणाऱ्या काळामध्ये जनतेला सर्वस्व मानून काम केलं जाईल. येणाऱ्या काळात हजारो कोट्यावधीचा निधी मंगळवेढा पंढरपूर तालुक्याच्या विकासात भर टाकण्यासाठी येणार आहे या निधीचा वापर योग्य पद्धतीने करण्याचा प्रयत्न अधिकारी वर्गाने केला पाहिजे आमदार अवताडे यांनी म्हटल्याप्रमाणे की ज्या ठेकेदारांनी काम केली नाही अशा लोकांना काळी यादी टाकून नवीन लोकांना काम देऊन तालुक्यांमध्ये काम करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे… शेवटी शासकीय अधिकारी हे सरकार आणि सर्वसामान्य जनता यांच्यामधील दुवा म्हणून काम करत शेवटी तुमच्या सहकार्यानेच या तालुक्याचा विकास होणार आहे हे मात्र नक्की असेही शेवटी डांगे म्हणाले.























