Homeराजकीयअजित पवारच जलसंपदा घोटाळ्याचे सूत्रधार, तत्कालीन मुख्य अभियंता विजय पांढरे यांचा गंभीर...

अजित पवारच जलसंपदा घोटाळ्याचे सूत्रधार, तत्कालीन मुख्य अभियंता विजय पांढरे यांचा गंभीर आरोप, पंतप्रधान मोदी आणि फडणवीस यांनी लपवले अजित पवारांचे पाप..

सोलापूर आजतक न्यूज नेटवर्क :
राज्यातील सिंचन घोटाळ्याचे अजित पवार हे खरे सूत्रधार होते. त्याचवेळी उच्चस्तरीय चौकशी नेमून त्यांच्यावर कारवाई केली असती तर ते तुरुंगात गेले असते. मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे पाप लपवले आणि त्याला पंतप्रधान मोदी यांनी पाठिंबा दिला, असा गंभीर आरोप जलसंपदा विभागाचे तत्कालीन मुख्य अभियंता विजय पांढरे यांना केला आहे.विजय पांढरे यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत अजित पवार यांच्याविरोधात जलसंपदा घोटाळ्याच्या आरोपांचा पुनरुच्चार केला आहे. सिंचन घोटाळाप्रकरणी अजित पवार यांना राजीनामा द्यावा लागला होता. त्यावेळी काँग्रेसने त्यांची चौकशी लावण्याचा प्रयत्न केला तर सरकार पाडण्यात आले, असे विजय पांढरे यांनी म्हटले आहे.

चितळे समितीचा अहवाल ठेवला लपवून…
माधवराव चितळे समितीने जलसिंचन घोटाळ्याच्या अहवालात भ्रष्टाचाराबाबत पुरेशा गोष्टी नमूद केल्या होत्या. चितळे यांनी एका मुलाखतीत बोलताना सांगितले होते की, याप्रकरणात चौकशीसाठी उच्चस्तरीय चौकशी नेमली पाहिजे. मात्र, सरकारने चितळे समितीचा अहवालही लपवून ठेवला. चितळे यांनी म्हटले होते की, मी दिलेल्या अहवालानुसार कारवाई केली तर अजित पवार जेलमध्ये जातील. मात्र, अजित पवारांचे जलसिंचन घोटाळे लपवण्याचे काम फडणवीस यांनी केले, यामध्ये शंका नाही, सिंचन घोटाळ्यात अजित पवारांना पाठीशी घालणारी दुसरी व्यक्ती म्हणजे नरेंद्र मोदी, असेही विजय पांढरे यांनी म्हटले आहे.

अद्याप नागपूर खंडपीठाची क्लीन चिटला मान्यता नाही…
देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना सिंचन घोटाळ्याच्या प्रकरणात क्लीन चिट देण्याचे काम केले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अजित पवार यांना सिंचन घोटाळ्यात क्लीन चिट दिल्याची लेखी माहिती नागपूर खंडपीठासमोर दिली. मात्र, अद्याप नागपूर खंडपीठाने ती क्लीन चिट मान्य केलेली नाही. सध्या या प्रकरणाची सुनावणी होत नाही ही खरी अडचण आहे, असे विजय पांढरे यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

तुतारी की कमळ… सोलापूर जिल्ह्यातील या नगरपालिकेच्या निकालासाठी लागली चक्क बुलेट गाडीची शर्यत

माळशिरस (तालुका प्रतिनिधी) माळशिरस तालुक्यातील अकलूज नगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत मोहिते–पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि भाजप यांच्यात चुरशीची टक्कर पाहायला मिळाली. ही निवडणूक...

दादासाहेब इंगोले जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित, जिल्हा परिषद केंद्र शाळा नंदेश्वरच्या वतीने सत्कार

सोलापूर आजतक न्यूज नेटवर्क जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, नंदेश्वर येथील उपशिक्षक दादासाहेब इंगोले यांना श्री. स्वामी समर्थ शासकीय व जिल्हा परिषद शिक्षक व सेवक सहकारी...

बजरंग चौगुले यांची काँग्रेसच्या तालुका उपाध्यक्षपदी फेरनिवड तर तालुका सरचिटणीसपदी आबासाहेब पाटील, नामदेव डांगे...

सोलापूर आजतक न्यूज नेटवर्क ✍️ ✍️ ✍️ मंगळवेढा तालुका काँग्रेस कमिटीच्या तालुका उपाध्यक्षपदी नंदेश्वर येथील बजरंग चौगुले यांची फेर निवड करण्यात आली आहे. तसेच...

मंगळवेढा नगरपालिकेत तुतारीचा राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाचा प्रवेश निश्चित, तुतारीचे उमेदवार प्रशांत यादव यांचेसह...

सोलापूर आजतक न्यूज नेटवर्क मंगळवेढा नगरपालिका निवडणुकीकडे संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. भाजप विरुद्ध तीर्थक्षेत्र विकास आघाडी अशी लढत सध्या होत आहे. मात्र सोलापूर...

खा.प्रणिती शिंदे यांच्या उपस्थितीत नंदेश्वर येथे शनिवारी होणार काँग्रेसची आगामी जि.प. व पं.स. निवडणूक...

जय भवानी नवरात्र महोत्सव मंडळ नंदेश्वरच्या देवी अंबाबाई मंदिराच्या सभा मंडपाचे खासदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते होणार उद्घाटन सोलापूर आजतक न्यूज नेटवर्क सोलापूर लोकसभा...

error: Content is protected !!