सोलापूर आजतक न्यूज नेटवर्क…
भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा चिटणीसपदी मंगळवेढा तालुक्यातील दक्षिण भागातील रड्डे गावचे सुपुत्र याराना परिवाराचे प्रमुख सुनील थोरबोले यांची निवड झाली आहे. आमदार समाधान आवताडे यांच्या शिफारशीने आणि जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण यांच्या आदेशानुसार ही निवड करण्यात आली असून, युवा नेतृत्वाला संधी देण्याच्या आ.आवताडे यांच्या धोरणाचा हा पुढचा टप्पा मानला जात आहे.

याराना परिवाराचा जल्लोष…
सुनील थोरबोले यांनी याराना परिवाराच्या माध्यमातून मंगळवेढा तालुक्याच्या दक्षिण भागात कार्यकर्त्यांचे मजबूत संघटन उभे केले आहे. त्यांच्या संघटन कौशल्यामुळे आणि सातत्यपूर्ण पक्षनिष्ठेमुळे पक्षाने त्यांच्यावर विश्वास दाखवला आहे. याशिवाय मंगळवेढा तालुक्यातील सर्वाधिक महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या ग्रामपंचायतींपैकी एक असणाऱ्या रड्डे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सुनील थोरबोले यांच्या मातोश्री विराजमान आहेत. सुनील थोरबोले यांच्या निवडीने याराना परिवाराच्या वतीने आनंद व्यक्त होत आहे.
आमदार समाधान आवताडे यांची आकाश डांगे, सुनील थोरबोले या युवा कार्यकर्त्यांना ताकद…
मागील निवडीत भारतीय जनता पार्टीच्या तालुका युवा मोर्चा अध्यक्षपदी आकाश डांगे यांची निवड करून आमदारांनी युवा कार्यकर्त्यांना प्रोत्साहन दिले होते. त्याच धर्तीवर यावेळी सुनील थोरबोले यांना जिल्हा चिटणीसपदाची संधी देऊन मंगळवेढा दक्षिण भागातील या दोन युवा नेत्यांची जोडी पक्षात अधिक बळकट करण्याचे संकेत मिळत आहेत.
























