सोलापूर आजतक न्यूज नेटवर्क..
नंदेश्वर येथील विकास सेवा सोसायटीचे चेअरमन भारत गरंडे यांना भोसे जिल्हा परिषद गटामधून आमदार समाधान आवताडे यांच्या गटाची उमेदवारी मिळावी अशी मागणी नंदेश्वर ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य माऊली उर्फ पिंटू बंडगर यांनी केली आहे. भारत गरंडे यांना उमेदवारी मिळावी म्हणून लवकरच नंदेश्वर गावातील तसेच दक्षिण भागातील व भोसे जिल्हा परिषद गटातील आम्ही असंख्य कार्यकर्ते आमदार समाधान आवताडे यांना भेटणार आहोत अशीही माहिती यावेळी माऊली बंडगर यांनी दिली.

नंदेश्वरच्या विकासात बहुमोल योगदान..
यावेळी बोलताना माऊली बंडगर म्हणाले की, नंदेश्वर ग्रामपंचायत स्थापन झाल्यापासून भारत गरंडे यांचे पुतणे अनिल गरंडे यांच्या सरपंच पदाच्या कार्यकाळात गावाला खऱ्या अर्थाने विकास पाहायला मिळाला. पुतणे अनिल गरंडे हे सरपंच पदावर विराजमान असले तरी भारत गरंडे यांनी अत्यंत हुशारीने आणि आमदार समाधान आवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली व माजी सभापती प्रदीप खांडेकर यांच्या पाठिंब्याने नंदेश्वर गावात मोठ्या प्रमाणावर विकासकामे केली.

कुशल नेतृत्वास संधी मिळणे गरजेचे…
याबरोबरच भारत गरंडे हे फक्त नंदेश्वर गावापुरते मर्यादित नसून त्यांच्या संपर्कात आलेल्या प्रत्येक माणसाला त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने मदत केली आहे. त्यामुळे असे हे कुशल नेतृत्व फक्त नंदेश्वर गावापुरते मर्यादित न ठेवता भोसे जिल्हा परिषद गटामधून त्यांना उमेदवारी देऊन या गटातील 16 गावचे प्रतिनिधित्व करायची संधी दिली तर या संधीचे ते सोने करतील. इतकेच नाही तर आपल्या उत्कृष्ट अशा संघटन कौशल्याने संपूर्ण भोसे जिल्हा परिषद गटात आमदार समाधान आवताडे यांचे कार्य व तसेच भाजपा पक्षाची ध्येय धोरणे अत्यंत चांगल्या पद्धतीने ते रुजवतील. त्यामुळे अशा या बहुआयामी नेतृत्वाला भोसे जिल्हा परिषद गटात उमेदवारी द्यावी अशी मागणी माऊली बंडगर यांनी केली आहे.
























