Homeराजकीयमंगळवेढा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी अनिल सावंत यांनी दिले उपमुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांना...

मंगळवेढा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी अनिल सावंत यांनी दिले उपमुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांना निवेदन, ना.शिंदे सकारात्मक असल्याची अनिल सावंत यांची माहिती

सोलापूर आजतक न्यूज नेटवर्क!
संतांची नगरी म्हणून ओळख असलेल्या मंगळवेढा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे नेते व भैरवनाथ उद्योग समूहाचे चेअरमन अनिल सावंत यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे कार्तिकी एकादशीच्या पूर्वसंध्येला पंढरपूर येथील सावंत निवास येथे झालेल्या भेटीत विविध मागण्यांचे निवेदन सादर केले आहे. मंगळवेढा ही संतांची पवित्र भूमी असून येथे संत बसवेश्वर महाराज, संत चोखामेळा, संत कान्होपात्रा, संत दामाजीपंत, श्री स्वामी समर्थ (अक्कलकोट), संत मोहिनीबुवा, संत टिकाचार्य महाराज, संत गोविंदबुवा आणि संत सिताराम महाराज यांसारख्या अनेक संतांचा पदस्पर्श मंगळवेढ्याला लाभला आहे. संत बसवेश्वर महाराज व संत चोखामेळा महाराज यांच्यासह इतर संतांच्या प्रलंबित स्मारकांबाबत तातडीने कार्यवाही करून या संतभूमीत त्यांच्या कार्याचा गौरव व्हावा. तसेच या भूमीचा तिर्थक्षेत्र म्हणून विकास न झाल्याने संत परंपरेला न्याय मिळालेला नसल्याने स्थानिकांना रोजगाराच्या संधीही कमी उपलब्ध आहेत. यावरही उपाययोजना करण्यात याव्यात.

नगरपरिषदेची हद्दवाढ अत्यावश्यक..
तसेच मंगळवेढा शहराच्या हद्द वाढीबाबत जिल्हा प्रशासनाकडून मंगळवेढा नगरपरिषदेच्या प्रस्ताव दिनांक ०५ मे २०२१ रोजी नगरविकास विभागाकडे पाठविण्यात आला असला तरी अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही. सध्याच्या मर्यादित हद्दीमुळे शहरातील विकासकामांना अडथळा निर्माण होत असून, नव्याने स्थापन झालेल्या संत दामाजीनगर आणि संत चोखामेळानगर ग्रामपंचायती पूर्णपणे नगरपरिषदेच्या नागरी सुविधांवर अवलंबून आहेत. त्यामुळे या दोन्ही ग्रामपंचायतींसह मंगळवेढा ग्रामीण भाग नगरपरिषदेच्या हद्दीत समाविष्ट करण्याची मागणी करण्यात आली. तसेच नगरपरिषदेच्या बाहेरील भागात अनियोजित बांधकामे मोठ्या प्रमाणात वाढत असून, नियोजनाचा अभाव भौतिक विकासात अडथळा ठरत आहे. शहराच्या सुयोग्य आणि नियोजनबद्ध वाढीसाठी नगरपरिषदेची हद्दवाढ अत्यावश्यक असल्याचे अनिल सावंत यांनी निवेदनात नमूद केले. तसेच शहराची रचना खोलगट भागाची असल्याने पाऊसाचे पाणी शहरात साचते. हे पाणी बाहेर काढण्यासाठी भुयारी गटार योजना राबविणे आवश्यक असून, त्याचे प्राथमिक सर्वेक्षण आणि अंदाजपत्रक तयार झाले आहे. ही योजना तातडीने मार्गी लावावी, अशीही मागणी निवेदनात करण्यात आली.

उपमुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे सकारात्मक – अनिल सावंत
याबाबत अनिल सावंत यांनी माध्यमाशी बोलताना सांगितले की मंगळवेढा शहराचा सर्वांगीण विकासासाठी राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांना प्रमुख तीन निवेदने सादर केली आहे. याबाबत त्यांनी संपूर्णपणे सकारात्मकता दर्शवली आहे. पंढरपूर मंगळवेढा शहरासह मतदारसंघाचा विकास करणे हेच आमचं ध्येय असल्याचे अनिल सावंत यांनी सांगितले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे शहराध्यक्ष चंद्रशेखर कोंडुभैरी, प्रथमेश पाटील,शाम गोगाव, संतोष रंदवे, माणिक गुंगे, सिताराम भगरे, कृष्णदेव लोंढे हे उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

तुतारी की कमळ… सोलापूर जिल्ह्यातील या नगरपालिकेच्या निकालासाठी लागली चक्क बुलेट गाडीची शर्यत

माळशिरस (तालुका प्रतिनिधी) माळशिरस तालुक्यातील अकलूज नगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत मोहिते–पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि भाजप यांच्यात चुरशीची टक्कर पाहायला मिळाली. ही निवडणूक...

दादासाहेब इंगोले जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित, जिल्हा परिषद केंद्र शाळा नंदेश्वरच्या वतीने सत्कार

सोलापूर आजतक न्यूज नेटवर्क जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, नंदेश्वर येथील उपशिक्षक दादासाहेब इंगोले यांना श्री. स्वामी समर्थ शासकीय व जिल्हा परिषद शिक्षक व सेवक सहकारी...

बजरंग चौगुले यांची काँग्रेसच्या तालुका उपाध्यक्षपदी फेरनिवड तर तालुका सरचिटणीसपदी आबासाहेब पाटील, नामदेव डांगे...

सोलापूर आजतक न्यूज नेटवर्क ✍️ ✍️ ✍️ मंगळवेढा तालुका काँग्रेस कमिटीच्या तालुका उपाध्यक्षपदी नंदेश्वर येथील बजरंग चौगुले यांची फेर निवड करण्यात आली आहे. तसेच...

मंगळवेढा नगरपालिकेत तुतारीचा राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाचा प्रवेश निश्चित, तुतारीचे उमेदवार प्रशांत यादव यांचेसह...

सोलापूर आजतक न्यूज नेटवर्क मंगळवेढा नगरपालिका निवडणुकीकडे संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. भाजप विरुद्ध तीर्थक्षेत्र विकास आघाडी अशी लढत सध्या होत आहे. मात्र सोलापूर...

खा.प्रणिती शिंदे यांच्या उपस्थितीत नंदेश्वर येथे शनिवारी होणार काँग्रेसची आगामी जि.प. व पं.स. निवडणूक...

जय भवानी नवरात्र महोत्सव मंडळ नंदेश्वरच्या देवी अंबाबाई मंदिराच्या सभा मंडपाचे खासदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते होणार उद्घाटन सोलापूर आजतक न्यूज नेटवर्क सोलापूर लोकसभा...

error: Content is protected !!