सोलापूर आजतक न्यूज नेटवर्क:
घरकुल योजना चांगल्या पद्धतीने राबविण्यात मंगळवेढा तालुक्यात नंदेश्वर ग्रामपंचायत अग्रस्थानी आहे. यासाठी आमदार समाधान आवताडे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक देऊन सरपंच सजाबाई गरंडे आणि ग्रामसेवक इंगोले मॅडम यांचा सत्कार करण्यात आला. आ.समाधान आवताडे यांच्या संकल्पनेतून मंगळवेढा तालुक्यातील सर्व शासकीय अधिकारी व पदाधिकारी यांची लाभार्थ्यांसमवेत अडी-अडचणी संदर्भात आढावा बैठक आयोजन करण्यात आली होती. यावेळी मंगळवेढा तालुक्यातील एकूण योजनेत ज्या ज्या ग्रामपंचायतीने विशेष योगदान दिले आहे त्या सर्व ग्रामपंचायतींचा सत्कार करण्यात आला.

यावेळी व्यासपीठावर भाजपा जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण, उपमुख्य कार्यकारी अधिकारी भुजबळ, पंचायत समिती गटविकास अधिकारी जस्मिन शेख, तहसीलदार मदन जाधव, माजी सभापती प्रदीप खांडेकर, औदुंबर वाडदेकर, सरपंच विनायक यादव, पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे, तालुका कृषी अधिकारी मनिषा मिसाळ, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य प्रदीप खांडेकर, नितीन पाटील, काशिनाथ पाटील, माजी नगरसेवक प्रवीण खवतोडे यांचेसह मान्यवर आणि प्रशासकीय अधिकारी व पदाधिकारी तसेच विविध गावांचे सरपंच, उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामसेवक उपस्थित होते.

सरपंच,उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेविका यांच्यासह सर्वांचेच प्रयत्न फळाला….
घरकुल योजना राबविण्यात अग्रस्थानी असल्याबद्दल आमदार समाधान आवताडे यांच्या हस्ते नंदेश्वर ग्रामपंचायतीचा सत्कार करण्यात आला. नंदेश्वर ग्रामपंचायतीने मिळवलेल्या या यशात सरपंच सौ सदाबाई गरंडे, उपसरपंच आनंद पाटील, ग्रामसेविका सौ इंगोले मॅडम यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि नंदेश्वर ग्रामपंचायतीचे कर्मचारी यांचे सर्वांचे सांघिक प्रयत्न फळाला आले असल्याची चर्चा सध्या होत आहे.
नंदेश्वर ग्रामपंचायत कार्यालयासाठी आ. समाधान आवताडे यांनी दिला भरघोस निधी….
नंदेश्वर ग्रामपंचायत कार्यालय नवीन बांधण्यासाठी आमदार समाधान आवताडे यांनी सुमारे 25 लाख रुपयांचा निधी नुकताच दिला आहे. आ.आवताडे हे सध्या नंदेश्वर गावातील अनेक विकास कामे मार्गी लावताना दिसत आहेत. काही दिवसांखाली मलुआई यात्रेनिमित्त आयोजित कुस्त्यांच्या मैदानाशी उद्घाटन करताना नंदेश्वर गावासाठी तालीम बांधण्यासाठी लागेल तितका निधी देवू असा त्यांनी शब्द दिला आहे. अशाप्रकारे नंदेश्वर ग्रामपंचायतीला आ.आवताडे यांच्या वतीने झुकते माप दिले जात असल्याचे वारंवार दिसले आहे.























