सोलापूर आजतक न्यूज नेटवर्क..
राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजित पवार सोलापूर जिल्ह्यातील ज्या वादग्रस्त कुर्डू गावातील बेकायदा मुरूम उपसा प्रकरणावरून अडचणीत आले आहेत. या वादात आता माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी उडी घेतली आहे. खासदार मोहिते पाटील यांनी प्रत्यक्ष कुर्डू गावाला भेट दिली. व पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले की, ना.अजितदादा हे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. एवढा मोठा माणूस डी वाय एस पी सारख्या अधिकाऱ्यांना थेट फोनवरून एका शेतकऱ्याच्या सांगण्यावरून कधीही बोलणार नाहीत. या संपूर्ण प्रकरणामागे एक मोठा माफीया आहे. चौकशीची सूत्रे ही या माफियाच्या दिशेने फिरली पाहिजेत. खासदार मोहिते पाटील यांच्या या वक्तव्यामुळे सोलापूर जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणावर सध्या चर्चा होत आहेत. खा.मोहिते पाटील यांच्या म्हणण्याप्रमाणे तो माफिया नेमका कोण??? दरम्यान गावातील शासकीय कामासाठी कोणतीही परवानगी न घेता बेकायदा मुरूम उपसा केल्याबद्दल कुर्डू गावचे सरपंच आणि ग्रामसेवक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर पुन्हा एकदा खासदार मोहिते पाटील यांनी पत्रकार परिषद घेत डी वाय एस पी यांना चौकशी करण्याची मोकळीक द्या अशी मागणी केली आणि मोकळी सूट दिल्यानंतर डीवायएसपी नेमक्या तो माफीया कोण त्याची चौकशी करतील असेही वक्तव्य केले. त्यामुळे पुन्हा एकदा चर्चा सुरू झाल्या आहेत.
सरपंच आणि ग्रामसेवकाने संगनमतकरुन मुरुम उपसा केल्याच्या गुन्हाची नोंद
मिळालेल्या माहितीनुसार, गावच्या तलाठी प्रिती शिंदे यांनी कुर्डूवाडी पोलिसांत तक्रार दिल्यानुसार सरपंच आणी ग्रामसेवक या दोघांनी संगनमतकरुन मुरुम उपसा केल्याच्या गुन्हाची नोंद झालीय. माढा महसुल प्रशासनाने दाखल केलेल्या मुरुम चोरीच्या तक्रारीवरुन कुर्डूत तहसीलदारांची अथवा कसलीही शासकीय परवानगी न घेता अवैधरित्या मुरुम उपसा झाला आहे, हे दाखल झालेल्या तक्रारीवरून आता उघड झाले आहे. त्यामुळे कारवाई रोखण्यासाठीच आयपीएस अंजना कृष्णा (IPS Anjana Krishna) यांना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी फोन केलेला हे आधोरेखित झाले आहे. रस्ता करण्यासाठी गावकऱ्यांना मुरुम लागत होता. मात्र उपसा केलेला हा मुरुम अवैधरित्या, परवाना न घेता उत्खनन केलेला होता हे अंतिमरित्या स्पष्ट झाले आहे.

प्रशासकीय कर्मचाऱ्यांना मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल..
कुर्डू गावात बेकायदा मुरूम उपसा होत असताना कारवाई करायला गेलेल्या प्रशासकीय कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण करण्यात आली. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर वायरल झाला आहे. यामुळे या प्रकरणात मोठा ट्विस्ट आला आहे आणि ज्यांनी मारहाण केली त्यांना मोठ्या प्रमाणावर अडचणींना सामोरे जावे लागत आहे. शिवाय या प्रकरणी अण्णा ढाणे, बाबा जगताप, संतोष कापरे आणि नितीन माळी या चौघांसह गावातील इतर 15 ते 20 लोकांवर 3 सप्टेंबर रोजी सरकारी कामात अडथळा आणणे, हाणामारी व बेकायदेशीर जमाव जमवणे इत्यादीबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शासकीय कामासाठी वापरण्यात येणाऱ्या मुरुमासाठी सुद्धा घ्यावी लागणार परवानगी..
दरम्यान, गावातील तलावातून सार्वजनिक कामासाठी जरी मुरूम उपसा करावायचे असल्यास त्यासाठी तहसीलदार यांच्याकडून परवानगी घेणे आवश्यक आहे. सार्वजनिक कामासाठी कोणतेही रॉयलटी न घेता परवानगी दिली जाते. मात्र कुर्डू गावात झालेला मुरूम उपसा प्रकरणात कोणत्याही प्रकारची परवानगी घेण्यात आलेली नव्हती. तहसीलदार यांनी केलेल्या प्राथमिक चौकशीतील हि माहिती उघड झाली आहे. दरम्यान जिल्हातील अवैध मुरूम, वाळू उपसावरील कारवाई संदर्भत पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी स्वतः व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे बैठक घेतली. या बैठकीत अवैध वाळू, मुरूम उपसा संदर्भात कारवाई सुरुच ठेवण्याच्या सूचना पालकमंत्री जायकुमार गोरे यांनी केल्याची हि माहिती पुढे आली आहे.























