नंदेश्वर (प्रतिनिधी)
दामाजीचे संचालक भिवानाना दोलतडे यांच्या सुविध्य पत्नी तथा मंगळवेढा तालुका पंचायत समितीच्या माजी उपसभापती कै. इंदुमती भिवानाना दोलतडे यांचे गुरुवार दिनांक २१ रोजी पहाटे तीन वाजता अल्पशा आजाराने दुर्दैवी निधन झाले. त्यांचा स्वभाव खूप प्रेमळ होता. त्यांच्या जाण्याने नंदेश्वर तसेच पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे. त्यांचे पश्चात पती, दोन मुले, सुना, नातवंडे अस मोठा परिवार आहे. श्री बागडेबाबा दूध संस्थेचे चेअरमन दादासाहेब दोलतडे व नंदेश्वरचे माजी सरपंच गेणा दोलतडे यांच्या त्या आई होत. त्यांचे अंत्यसंस्कार नंदेश्वर ता.मंगळवेढा येथे आज गुरुवार दिनांक 21 रोजी सकाळी नऊ वाजता होणार आहेत.
