सोलापूर आजतक न्यूज नेटवर्क…
मंगळवेढा तालुक्यातील भाळवणी येथील महिला शेतकरी विद्या गेजगे आणि तायडा महादेव चौगुले यांनी शेजारी कार्यरत असलेल्या प्रज्वल सौर ऊर्जा कंपनीने त्यांच्या शेतात हेतुपुरस्सर पाणी सोडल्याचा गंभीर आरोप केला आहे. या घटनेत चौगुले यांच्या चार एकर शेतीचे मोठे नुकसान झाले असून, भरपाई न मिळाल्यास दोन्ही महिलांनी कुटुंबासह आत्महदहन करण्याचा धक्कादायक इशारा दिला होता.
तहसील कार्यालयात दिलेल्या तक्रारीची दखल नाहीच…
या प्रकरणाची रीतसर तक्रार मंगळवेढा तहसीलदारांकडे पीडित कुटुंबीयांनी दिली आहे. पण तक्रार देऊन चार ते पाच दिवस उलटले असताना देखील अजून प्रशासनाच्या वतीने कोणतीही कार्यवाही करण्यात आली नसल्यामुळे प्रशासनाच्या कार्यवाहीवर प्रश्नचिन्ह उभे केले जात आहेत. तसेच प्रशासनाने कारवाई न केल्यामुळे दोन्ही पिडीत कुटुंबीयांनी सदर सौरऊर्जा कंपनीचे कामकाज बंद पाडू असा इशारा दिला आहे. आणि या दरम्यान काही बरेवाईट घटना घडली तर यासाठी सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील असाही इशारा पीडित कुटुंबीयांनी दिला आहे.
निसर्गनिर्मित नाही तर मानवनिर्मित संकट….
सध्या निसर्गनिर्मित असणाऱ्या अतिवृष्टीच्या संकटामुळे राज्यभरातील शेतकरी अडचणीत आहेत. पण आम्ही आमच्या शेताच्या शेजारी असणाऱ्या सौरऊर्जा कंपनीने हेतू पुरस्सर पाणी सोडण्याच्या मानवनिर्मित संकटामुळे आमची शेती पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे. यासाठी आम्ही कंपनीकडे वारंवार पाठपुरावा केला त्यांनी फक्त उडवाउडवीची उत्तरे देण्यापलीकडे काहीही केले नाही. याच्याही पुढे जाऊन आम्ही मंगळवेढा तहसील कार्यालयात आमच्यावर जे संकट उडवले आहे त्या सर्व संकटाची रीतसर तक्रार केली आहे. मायबाप प्रशासनाकडून देखील आम्हाला कोणत्याही प्रकारचा न्याय मिळत आम्ही कंपनीचे कामकाज बंद पाडणार तर आहोतच. यातूनही आमच्या पदरात काही पडले नाही तर आम्हाला आत्मदहनाशिवाय पर्याय उरणार नाही. अशी माहिती पीडित महिला शेतकरी तायडा चौगुले आणि विद्या गेजगे यांनी दिली आहे.यावेळी महादेव चौगुले, दगडू गेजगे, ओम चौगुले, जबरदस्त चौगुले, अनुसया चौगुले उपस्थित होते.
