सोलापूर आजतक न्यूज नेटवर्क:
मंगळवेढा शहरात ईद-ए-मिलादच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या भव्य रॅलीतील सर्व मुस्लिम बांधवांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष व अनिलदादा सावंत फाउंडेशन च्या वतीने आपुलकीचे प्रतीक म्हणून सर्व मुस्लिम बांधवांचे स्वागत करत बिस्किटांचे वाटप केले. मंगळवेढा शहरात ईद-ए-मिलादच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या भव्य रॅलीत सर्व मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते रॅलीच्या निमित्ताने मुस्लिम बांधव एकत्र येऊन सद्भावना, एकोपा आणि सामाजिक ऐक्याचा सुंदर संदेश देताना पहावयास मिळाले.यावेळी रॅलीतील सर्व मुस्लिम बांधवांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष व अनिलदादा सावंत फाउंडेशन पंढरपूर-मंगळवेढा यांच्यावतीने शिवप्रेमी चौकातील जनसंपर्क कार्यालया समोर आपुलकीचे प्रतीक म्हणून सर्व मुस्लिम बांधवांच्या स्वागताचे व खाऊ वाटपाचे नियोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी भैरवनाथ उद्योग समूहाचे व्हा. चेअरमन अनिल सावंत रतनचंद शहा बँकेचे चेअरमन राहुल शहा, संतोष रंधवे, माणिक गुंगे, जमीर इनामदार, अनिल डोरले यांनी उपस्थित राहून ईद-ए-मिलादच्या या पावन पर्वानिमित्त व पैगंबर जयंती निमित्त सर्व मुस्लिम बांधवांना हार्दिक शुभेच्छा दिल्या व बिस्किटाचे वाटप केले.
