(सोलापूर आजतक न्यूज नेटवर्क)
नाभिक, धोबी समाजाला एससीमधून आरक्षण द्या, अशी मागणी लक्ष्मण हाके यांनी केली आहे. बलुत्या-आलुत्यामधील आमचा नाभिक समाज असेल, धोबी समाज असेल, बलुत्या -आलुत्या वाल्यांना एससी आरक्षण मिळावं. कारण देशातील अनेक राज्यांमध्ये ते एससीमध्ये येतात. आणि जर या सर्व गोष्टी कोणी एससी, एसटीमध्ये देणार असतील तर आम्हाला आनंद आहे, असं हाके यांनी म्हटलं आहे.राज्यात सध्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून वाद सुरू असतानाच आता ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केलेल्या नव्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला आहे.
राज्यात सध्या आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे, राज्य सरकारने मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर हैदराबाद गॅझेट लागू केलं आहे, मात्र या गॅझेटला ओबीसी समाजाकडून विरोध होत आहे. हैदराबाद गॅझेटनंतर राज्यात ओबीस विरूद्ध मराठा समाज असं चित्र पहायला मिळत आहे. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण नको अशी भूमिका ओबीसी समाजाची आहे. तर दुसरीकडे हैदराबाद गॅझेटच्या आधारे आमचा समावेश हा एसटी प्रवर्गात करावा अशी मागणी बंजारा समाजानं केली आहे.
एसटी प्रवर्गात समावेश करा, बंजारा समाजाची मागणी…
एसटी प्रवर्गात समावेश करावा या मागणीसाठी बंजारा समाजानं आंदोलन सुरू केले आहे, तर बंजारा समाजाच्या या मागणीला आदिवासी समाजाकडून विरोध होत आहे. आदिवासी आणि बंजारा समाज आमने-सामने आले आहेत. तर दुसरीकडे जालन्यात धनगर समाजाचं देखील आंदोलन सुरू झालं आहे. धनगर समाजाचा एसटीमध्ये समावेश करावा अशी मागणी आहे.
हाकेंच्या मागणीला तीव्र विरोध…
दरम्यान हाके यांच्या या मागणीनंतर संतप्त प्रतिक्रिया समोर येत आहेत. लक्ष्मण हाके यांनी एससी आरक्षणाकडे वाकड्या नजरेनं पाहू नये, वाकड्या नजरेनं पाहिलं तर डोळे काढून हातात देऊ असा इशारा पँथर सेनेचे अध्यक्ष दीपक केदार यांनी दिला आहे, तर आमच्या एससी समाजाला खवळू नका, नाहीतर पुन्हा भीमा कोरेगावचा इतिहास घडेल असा इशारा सचिन खरात यांनी दिला आहे. लक्ष्मण हाके यांच्या या मागणीनंतर आता हा वाद आणखी वाढण्याची शक्यता आहे.
हाके यांच्या मागणीचे परिणाम…
@ लक्ष्मण हाकेंच्या मागणीवर इतर ओबीसी नेत्यांची काय प्रतिक्रिया आहे?…
@ लक्ष्मण हाकेंच्या मागणीमुळे कोणत्या समाजात अधिक वाद होण्याची शक्यता आहे?…
@ लक्ष्मण हाकेंच्या मागणीमुळे कोणत्या राजकीय पक्षांनी प्रतिक्रिया दिली आहे?..
@ लक्ष्मण हाकेंच्या मागणीमुळे आरक्षणाच्या मुद्द्यावर काय परिणाम होतील?…
