(सोलापूर आजतक न्यूज नेटवर्क)
बाळकृष्ण माऊलींच्या पुण्यतिथी सप्ताह सोहळ्याची सुरुवात आज पहाटे उत्साही वातावरणात प्रभातफेरीने होईल. सकाळी ५ वाजता सुरू होणाऱ्या प्रभातफेरीमध्ये लहान मुले, वृद्ध, स्त्रिया आणि युवकांचा मोठा सहभाग पाहायला मिळतात. माऊलींचे भक्त अभंगगायन करत संपूर्ण प्रदक्षिणा मार्गावरून प्रभातफेरी पूर्ण करतात.प्रदक्षिणा मार्गावरील घरांतील महिलांनी सडा-शिंपण, रांगोळ्यांनी प्रभातफेरीचे जल्लोषात स्वागत करतात. या धार्मिक वातावरणाने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होते.
प्रभात फेरीतील रिंगण सोहळा प्रमुख आकर्षण…
बाळकृष्ण माऊलींचे गुरु गिरिमल्लेश्वर महाराज यांच्या मंदिरासमोर पार पडलेला नयनरम्य रिंगण सोहळा हा पुण्यतिथी सप्ताह सोहळा काळात संपन्न होणाऱ्या प्रभात फेरीचे मुख्य आकर्षण असणार आहे. या सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने भाविकांची गर्दी होते. रंगतदार व आकर्षक रिंगण पाहताना भाविक मंत्रमुग्ध होतात. यानंतर सकाळी ११ वाजता मठाधिपती बाळासाहेब महाराज यांच्या हस्ते विणापूजन करून सप्ताहास सुरुवात होईल. यावेळी बाळासाहेब महाराज यांचे सुश्राव्य प्रवचन होईल.शनिवार दि. 27 सप्टेंबर रोजी दुपारी चार ते सहा या वेळेत शिवाजीराव पवार बार्शी यांचे व्याख्यान होणार आहे. तसेच रात्री ह.भ.प. शिवाजी महाराज गेळे यांचे कीर्तन होणार आहे.
