योग्य पोषणद्रव्ये आणि योग्य लागवडीचे अंतर वापरून शेतीला भक्कम अर्थप्राप्तीचे साधन बनवा – कृषीतज्ञ अजय आदाटे
मंगळवेढा /प्रतिनिधी :
लागवडीचे अंतर आणि योग्य पोषणद्रव्ये वापरून शेतीला भक्कम अर्थप्राप्तीचे साधन बनवा असे मार्गदर्शनपर प्रतिपादन ॲग्रीक्रॉस एक्सपोर्टस प्रा. लि. पुणे चे मॅनेजिंग डायरेक्टर तथा नामांकित कृषी तज्ञ अजय आदाटे यांनी व्यक्त केले आहे. मंगळवेढा तालुक्यातील येड्राव व बावची येथे राष्ट्रीय अन्न सुरक्षा व पोषण अभियानाच्या अंतर्गत सूर्यफूल, तूर पीक विषयक शेतकरी प्रशिक्षण व हॉर्टसॅप अंतर्गत डाळिंब पिकाची शेतीशाळा कृषीतज्ञ अजय आदाटे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये जंगलगी येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
विविध विषयांवर सखोल आणि महत्त्वपूर्ण मार्गदर्शन..
या कार्यक्रमामध्ये सूर्यफूल, तूर तसेच डाळिंब पिकाची नवीन लागवड तंत्रज्ञान, कीड व रोग व्यवस्थापन, उत्पादनवाढीच्या आधुनिक पद्धती तसेच पोषणमूल्य व बाजारपेठेतील संधी याविषयी सविस्तर मार्गदर्शन श्री अजय आदाटे यांनी केले. पुढे बोलताना आदाटे यांनी सांगितले की, आपल्या पारंपरिक शेतीला आधुनिकतेची जोड देऊन व बाजारपेठेतील संधींचा शोध घेऊन आपण आपल्या शेतशिवारामध्ये नवनवीन प्रयोग करून कोणत्याही पिकांचे उत्पादन अपेक्षेप्रमाणे घेऊ शकतो. शेती व्यवसायामध्ये आपणास कोणत्याही प्रकारच्या अडचणी अथवा समस्या निर्माण झाल्यास आपण निसंकोचपणे ॲग्रीकॉस एक्स्पोर्टस प्रा. लि. या कंपनीचे संपर्क साधून आपल्या शंकांचे निरसन करून घेऊ शकता असेही त्यांनी यावेळी आवर्जून नमूद केले.
पंचकोशीतील शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
सदर कार्यक्रमाप्रसंगी या भागातील तसेच पंचक्रोशीतील शेतकरी बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. उपस्थित शेतकऱ्यांनी मनोभावे प्रशिक्षणात सहभाग घेतला व कृषी क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्याची तयारी दर्शवली. या यशस्वी आयोजनामुळे शेतकऱ्यांमध्ये जागरूकता निर्माण होऊन अधिक उत्पादनक्षम, पोषक व शाश्वत शेतीस चालना मिळेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला.. कार्यक्रमासाठी प्रास्ताविक श्री मंगेश लासूरकार सहा. कृषि अधिकारी यांनी केले व कार्यक्रमासाठी दीपक ऐवळे मंडळ कृषी अधिकारी (प्र), युवराज यादव उप कृषी अधिकारी हरीश काटकर, ग्राम महसूल अधिकारी मनिषा गावडे, सहा. कृषि अधिकारी अमोल चंदनशिवे, सहा. कृषी अधिकारी सुनीत इंगळे, सकृअ. स्वप्नील बलछत्रे, कृषी सेवक दयानंद रामगुळे, कृषीसेवक तसेच मौजे येड्राव येथील सरपंच संजय पाटील, संजय किसन पाटील उप. सरपंच, येड्राव व शेतकरी वर्ग यांचे उपस्थिती मध्ये सदर कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
