नंदेश्वर/श्रीकांत सासणे
विधान परिषदेचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या वाढदिवसानिमित्त नंदेश्वर येथील जिल्हा परिषद केंद्र शाळेतील विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले. माजी जिल्हा परिषद सदस्य नामदेव जानकर, शिवसेना तालुकाप्रमुख अशोक चौंडे, ग्रामपंचायत सदस्य माऊली बंडगर, कोंडीराम पतसंस्थेचे चेअरमन बंडू करे, माजी उपसरपंच वसंत बंडगर, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बाबासाहेब सासणे यांच्या प्रमुख उपस्थितीत वह्यांचे वाटप करण्यात आले. प्रशालेतील सुमारे 165 विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले. केंद्रशाळेसह नंदेश्वर गावातील वाड्या वस्त्यांवरील जिल्हा परिषद शाळांमध्येही वह्यांचे वाटप करण्यात आले.
वह्या वाटपाचा कार्यक्रम आदर्शवत – बंडू करे
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कोंडीराम पतसंस्थेचे चेअरमन बंडू करे म्हणाले की, वाढदिवसाला शालेय विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करणे हा उपक्रम अत्यंत उत्कृष्ट आहे. जिल्ह्याचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांची राजकीय कारकीर्दही सामाजिक बांधिलकी जपतच सुरू आहे. एकूणच शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम आदर्शवत आहे असे यावेळी करे बोलताना म्हणाले. यावेळी चेतना पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन लखन गरंडे, नानासाहेब बंडगर, नामदेव डांगे, मधुकर गरंडे, ज्ञानू गरंडे, विजय डांगे यांचेसह प्रशालेचे सहशिक्षक अशोक मासाळ, बाळासाहेब मासाळ, सुशीला सलगर, दादासाहेब इंगोले, सचिन लाळे, बाळासाहेब मोरे, सुसेन क्षीरसागर हे उपस्थित होते.
