(सोलापूर आजतक न्यूज नेटवर्क)
सोन्याच्या लालसेपोटी मृतदेहाची राख व अस्थी चोरीला गेल्याची धक्कादायक घटना कुरुल येथे घडली आहे. स्मशानभूमीतून झालेल्या या चोरीमुळे गावभरात संतापाची लाट उसळली आहे. नागरिकांनी तातडीने स्मशानभूमीत सीसीटीव्ही बसवण्याची मागणी केली आहे.
राख व अस्थी गायब नातेवाईकांना धक्का…
१७ सप्टेंबर रोजी उज्ज्वला संतोष माळी (रा. कुरुल) यांचे निधन झाले. दुसऱ्या दिवशी कुटुंबीयांनी त्यांचा अंत्यविधी सोहाळे रोडवरील स्मशानभूमीत केला. परंतु, गुरुवारी सकाळी
अस्थी व राख सावडण्यासाठी नातेवाईक स्मशानभूमीत गेले असता राख व अस्थी गायब झाल्याचे आढळले. या घटनेमुळे माळी कुटुंबासह गावकऱ्यांमध्ये तीव्र संताप करण्यात आला.
मृत महिला सौभाग्यवती असेल तर अंत्यसंस्कार यावेळी तिच्या शरीरावरील दागिने ठेवले जातात….
परंपरेनुसार, जर मृत्यू झालेली महिला सौभाग्यवती असेल, तर तिच्या अंगावरील दागिने अंत्यसंस्कारावेळी तसेच ठेवले जातात. हीच बाब लक्षात घेऊन काही टोळ्या माहिती गोळा करतात आणि संधी साधून मध्यरात्री स्मशानभूमीत घुसून राख व अस्थी चोरी करतात. हाच प्रकार घडल्याची माळी कुटुंबाची तक्रार आहे. त्यांनी ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन घडलेली घटना सांगितली. सीसीटीव्ही बसविण्याची मागणी केली. स्मशानभूमी कुरुल गावापासून साधारण एक किलोमीटर अंतरावर आहे. त्याठिकाणी कोणाचाही बावर नसतो. ही संधी चोरट्यांनी साधली.
स्मशानभूमीत सीसीटीव्ही बसवण्याची मागणी….
मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांच्या भावनांगी खेळणाऱ्या या अमानुष कृत्यांवर आळा बसवण्यासाठी स्मशानभूमीत प्रखर दिवे स्ट्रीटलाईट आणि सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे अत्यावश्यक असल्याचे नागरिकांचे मत आहे.
