सोलापूर आजतक न्यूज नेटवर्क:
पीक कर्जासह शासकीय अनुदानाची कर्ज प्रकरणे मंजूर करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. अग्रणी बँकेच्या जिल्हा व्यवस्थापकांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आबा खांडेकर, सुनील बंडगर, बाबुराव मासाळ, बापू कोकरे यांनी मागणीचे निवेदन दिले.
एक एप्रिल पासून पोर्टल बंद…
ग्रामीण भागातील शेतकरी सर्वसामान्य नागरिक यांचे जीवनमान उंचवावे म्हणून शासनाकडून प्रास्तावित असलेले वसंतराव नाईक महामंडळ, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळ व अन्य मुख्यमंत्री कौशल्य विकास कार्यक्रम व पंतप्रधान कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत मंजूर करण्यात आलेली प्रकरणे, एनएलएम (राष्ट्रीय पशुधन अभियान) ही केंद्र सरकारची कुक्कुटपालन, मेंढ्या, शेळ्या आणि डुक्कर पालनातील उद्योजकता विकासासाठीची योजनेतील कर्जवाटप तालुक्यात एक एप्रिलपासून पोर्टल बंद असल्याने वाटप नाही.
प्रकरणे मंजूर करण्याबाबत बँकांना निर्देशित करावे…
सदर कर्ज प्रकरणे मंजूर करण्याबाबत संबंधित बँकांना निर्देशित करावे. बैंक ऑफ इंडिया भोसे शाखेतही नवीन कर्जवाटप होत नाही याशिवाय विदर्भ कोकण ग्रामीण बैंक शाखा निंबोणी व सलगर बुद्रुक या बँकेचे विलीनीकरण महाराष्ट्र ग्रामीण बँकेत झाले आहे. या बँकेने अद्याप पिक कर्ज व अशा नवीन कर्ज विषेयक प्रकरणाला अद्याप सुरुवात केली नाही तरी त्यांना कर्ज वाटप करण्याबाबतचे आदेश आपल्या स्तरावरून व्हावेत अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
