(सोलापूर आजतक न्यूज नेटवर्क)
नंदेश्वर ता. मंगळवेढा येथील तुकाराम चौडाप्पा मेटकरी यांचे सोमवार दिनांक 22 रोजी रात्री ठीक दहा वा. अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय 85 वर्षे होते. त्यांचे पश्चात तीन मुले, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. शिक्षक नेते ज्ञानेश्वर मेटकरी यांचे वडील तर सोलापूर जिल्हा परिषद महिला व बालकल्याण माजी सभापती रतनताई ज्ञानेश्वर मेटकरी यांचे ते सासरे होत. अंत्यविधी मंगळवार दिनांक 23 रोजी सकाळी ठीक आठ वाजता होणार असल्याची माहिती मेटकरी कुटुंबीयांच्या वतीने देण्यात आली आहे.
