(सोलापूर आजतक न्यूज नेटवर्क)
नंदेश्वर तालुका मंगळवेढा येथे श्री बाळकृष्ण माऊलींचा पुण्यतिथी सप्ताह सोहळा शनिवार दि. 27 पासून सुरू होणार आहे. बुधवार दिनांक १ आक्टोंबर रोजी सप्ताह सोहळ्याची सांगता होणार आहे. या पाच दिवसाच्या काळात अनेक धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. यामध्ये प्रवचने कीर्तने, व्याख्याने, धनगरी ओव्या हे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
शनिवार दि. 27 सप्टेंबर रोजी दुपारी चार ते सहा या वेळेत शिवाजीराव पवार बार्शी यांचे व्याख्यान होणार आहे. तसेच रात्री ह.भ.प. शिवाजी महाराज गेळे यांचे कीर्तन होणार आहे. रविवार दि. 28 रोजी रात्री नऊ ते 11 वाजता ह भ प अभंग महाराज सोमवंशी अहिल्यानगर यांचे किर्तन होईल. सोमवार दि. 29 रोजी सकाळी 11 वा. ह.भ.प. डॉ. जयंत करंदीकर महाराज कुर्डवाडी यांचे प्रवचन व रात्री आठ वा. शाहीर सत्यवान गावडे यांचा धनगरी ओव्यांचा कार्यक्रम होईल.
मंगळवार दि. 30 रोजी सायंकाळी पाच वाजता श्री बाळकृष्ण माऊलींच्या पालखीची व रथाची भव्य अशी मिरवणूक निघणार आहे. रात्री ह.भ.प.आप्पा महाराज पांचाळ चिपळूण यांचे कीर्तन होईल. बुधवार दि. १ ऑक्टोंबर रोजी सकाळी संगीत भजन सुरू होईल यानंतर ठीक १०.३० वाजता बाळकृष्ण माऊली मठाचे मठाधिपती बाळासाहेब महाराज यांचे सुश्राव्य असे प्रवचन होईल दुपार ठीक बारा वाजता पुष्पवृष्टी होऊन महाप्रसादनंतर या पुण्यतिथी सप्ताह सोहळ्याची सांगता होणार आहे.
