नंदेश्वर येथे ज्योतिर्लिंग सुपर मार्केटचे उद्घाटन संपन्न
नंदेश्वर/ प्रतिनिधी
घरगुती व जीवनावश्यक वस्तूंपासून ते सर्वच वस्तू एका छताखाली व योग्य दरात मिळण्यासाठी मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर येथे सुरू झालेल्या ज्योतिर्लिंग सुपर मार्केटमुळे नंदेश्वर व तालुक्याच्या दक्षिण भागाच्या वैभवात भर पडली असल्याची प्रतिक्रिया श्री बाळकृष्ण माऊली मठाचे मठाधिपती बाळासाहेब महाराज यांनी व्यक्त केली आहे. मंगळवेढा-जत रस्त्यावर नंदेश्वर गावात सुरू झालेल्या ज्योतिर्लिंग सुपर मार्केटच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख दत्तात्रय सावंत, संभाजी कळकुंबे, बादल कळकुंबे, माजी उपसरपंच राहुल कसबे, ग्रामपंचायत सदस्य तानाजी मोटे, माजी ग्रामपंचायत सदस्य पप्पू कळकुंबे, नेताजी कळकुंबे, वैभव हजारे, गणेश कळकुंबे यांचेसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना बाळासाहेब महाराज म्हणाले की, मंगळवेढा-हुन्नूर रस्त्यानजिक नंदेश्वर येथे ज्योतिर्लिंग सुपर मार्केट सुरू झाले आहे. घरगुती आणि जीवनावश्यक वस्तूंपासून ते सर्वच वस्तू एकाच ठिकाणी आणि होलसेल दरात मिळाव्यात ही ग्रामीण भागातील लोकांची अनेक दिवसांपासूनची मागणी होती. ही मागणी नंदेश्वर येथील उद्योजक बादल कळकुंबे यांच्या संकल्पनेतून पूर्ण होताना दिसत आहे.
चौकट
सध्या महागाईमुळे जनसामान्यांचे जीवन विस्कळीत झाले आहे. त्यामुळे नवीन उद्योग सुरू करताना या उद्योगातून सेवाधर्म डोळ्यासमोर ठेवून उद्योग सुरू करण्याचा माझा प्रयत्न आहे. प्रोडक्शन मिल पासून थेट ग्राहकांपर्यंत माल वितरित केला तर तो माल ग्राहकांना स्वस्त दरात देता येतो हा आमचा उद्देश आहे. जास्तीत जास्त ग्राहकांचा फायदा होईल अशा प्रकारचे नियोजन ज्योतिर्लिंग सुपर मार्केटच्या माध्यमातून केले जाणार आहे.
बादल कळकुंबे
उद्योजक
