Homeराजकीयभोसे जिल्हा परिषद गटात राजकीय हालचालींना वेग; भैरवनाथ शुगरमध्ये सोमवारी होणार विचारविनिमय...

भोसे जिल्हा परिषद गटात राजकीय हालचालींना वेग; भैरवनाथ शुगरमध्ये सोमवारी होणार विचारविनिमय बैठक, भोसे जिल्हा परिषद गटासह मंगळवेढा तालुक्याचे लक्ष

लवंगी / विशेष प्रतिनिधी : भोसे जिल्हा परिषद गटातील राजकीय वातावरण सध्या चांगलेच तापले असून, येत्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण घडामोडी घडू लागल्या आहेत. भैरवनाथ शुगरचे चेअरमन अनिल सावंत यांच्यावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्ते व शुभचिंतकांची एक महत्त्वाची विचारविनिमय बैठक लवंगी येथील भैरवनाथ शुगर कारखान्यात आयोजित करण्यात आली आहे.

कोणाला मिळणार मतरुपी आशीर्वाद??
भोसे जिल्हा परिषद गटातून सध्या भाजपकडून प्रदीप खांडेकर तर तीर्थक्षेत्र विकास आघाडीकडून बसवराज पाटील हे निवडणूक रिंगणात आमनेसामने उभे ठाकले आहेत. या दोन्ही उमेदवारांपैकी कोणाला आपला मतरूपी आशीर्वाद द्यायचा, याबाबत अनिल सावंत समर्थकांमध्ये सखोल चर्चा करण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

अनिल सावंतांची माघार लागली होती कार्यकर्त्यांच्या जिव्हारी
ही बैठक सोमवार, दिनांक 2 फेब्रुवारी रोजी दुपारी ठीक 12.30 वाजता आयोजित करण्यात आली असून, या बैठकीकडे संपूर्ण भोसे जिल्हा परिषद गटासह मंगळवेढा तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे. विशेष बाब म्हणजे, अनिल सावंत हे स्वतः भोसे जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढविण्यास इच्छुक होते. मात्र काही कारणास्तव त्यांनी या निवडणुकीतून माघार घेतली होती. ही माघार त्यांच्या कार्यकर्ते व शुभचिंतकांच्या जिव्हारी लागली असून, आपला नेता निवडणूक रिंगणात का उतरला नाही? अशी भावना अनेकांमध्ये व्यक्त होत आहे. याच पार्श्वभूमीवर सोमवारी होणाऱ्या बैठकीत कार्यकर्त्यांची भूमिका, भावना आणि पुढील राजकीय दिशा स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

राजकीय वर्तुळात उत्सुकता
या बैठकीतून एखाद्या उमेदवाराला उघड पाठिंबा जाहीर होतो का, की स्वतंत्र भूमिका घेतली जाते, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे. त्यामुळे भोसे जिल्हा परिषद गटातील राजकीय समीकरणे बदलणार की अधिक रंगणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मंगळवेढ्यात आरोग्यसेवेचा नवा आधारवड बेलदार हॉस्पिटल, अल्पावधीतच ठरले विश्वासार्ह

मंगळवेढा / प्रतिनिधी : मंगळवेढा तालुक्यात आरोग्यसेवेच्या क्षेत्रात अल्पावधीतच ठसा उमटवणारे बेलदार हॉस्पिटल सध्या रुग्णांसाठी आशेचा किरण ठरत आहे. उद्घाटनानंतर अवघ्या दोन महिन्यांच्या कालावधीत...

नंदेश्वर व परिसरातील खाद्यप्रेमींसाठी दोस्ती चायनीज सेंटर सेवेत, उद्घाटन सोहळा दिमाखात संपन्न

नंदेश्वर / प्रतिनिधी : नंदेश्वर (ता. मंगळवेढा) येथील खाद्यप्रेमींसाठी आनंदाची बातमी ठरावी, अशा वातावरणात दोस्ती चायनीज सेंटरचे उद्घाटन उत्साहात व मोठ्या थाटामाटात पार पडले....

माळशिरस येथील प्रभू विश्वकर्मा मंदिराच्या जागेवरून वाद चिघळला; लोहार समाज आक्रमक, राज्यभर आंदोलनांची लाट

माळशिरस / प्रतिनिधी : लोहार समाजाचे आराध्य दैवत असलेल्या प्रभु विश्वकर्मा मंदिरासाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या जागेवरून माळशिरस येथे मोठा वाद निर्माण झाला असून,...

बापूसाहेब आडसूळ यांचा लोहार समाज संघटनेच्या वतीने सत्कार

सोलापूर / प्रतिनिधी : एकनाथ स्वाभिमानी शिक्षककर्मचारी पतसंस्थाच्या चेअरमनपदी बापूसाहेब आडसूळ यांची निवड झाल्याबद्दल लोहार समाजाच्या वतीने त्यांचा सत्कार करून अभिनंदन करण्यात आले. समाजातील...

नंदेश्वर येथे वनपरिक्षेत्रातील वनराईला भीषण आग; अनेक वृक्ष जळून खाक, सुस्त वनविभाग कधी जागा...

नंदेश्वर / प्रतिनिधी : नंदेश्वर येथील वनपरिक्षेत्रातील वनराईला गुरुवार दि. ४ मार्च रोजी पहाटेच्या सुमारास अचानक भीषण आग लागल्याची घटना उघडकीस आली. पहाटेच्या वेळी...

error: Content is protected !!