Homeराजकीयभोसे जिल्हा परिषद गटात होणार तगडी फाईट, अनेक रथी-महारथी इच्छुक, ही आहेत...

भोसे जिल्हा परिषद गटात होणार तगडी फाईट, अनेक रथी-महारथी इच्छुक, ही आहेत इच्छुकांची नावे

नंदेश्वर / विशेष प्रतिनिधी : “मिनी विधानसभा” निवडणुक म्हणून ज्या निवडणुकीकडे पाहिले जाते अशी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक जाहीर झाली असून अगदी परवापासून अर्ज भरण्यास सुरुवात होत आहे. त्या अनुषंगाने मंगळवेढा तालुक्यात राजकीय वातावरण मोठ्या प्रमाणावर ढवळून निघत आहे. मंगळवेढा तालुक्यात एकूण चार जिल्हा परिषद गट आणि आठ पंचायत समिती गण असून सर्व जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणांमध्ये निवडणुकीची तारीख अगदी जवळ आली असल्यामुळे इच्छुकांची धावपळ उडाली आहे. चार जिल्हा परिषद गटांपैकी भोसे जिल्हा परिषद गटात हायव्होल्टेज लढत होणार असल्याची चर्चा निवडणूक जाहीर होण्याच्या अगोदरपासून सुरू आहे.

सर्वसाधारण आरक्षण असलेल्या भोसे जिल्हा परिषद गटात निवडणूक लढविण्यासाठी अनेक रथी महारथी इच्छुक असल्याच्या चर्चा होत आहेत. तशा प्रकारची इच्छा अनेकांनी बोलून दाखवल्या आहेत व इच्छुक उमेदवार गाठीभेटी घेत आहे तर त्यामुळे अनेक रथी-महारथींची नावे समोर येत आहेत. यामध्ये सर्वात आघाडीवर भैरवनाथ शुगरचे चेअरमन तथा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अनिल सावंत यांचे नाव सर्वात आघाडीवर आहे. अनिल सावंत यांनी आजपर्यंत भोसे जिल्हा परिषद गटात निवडणूक लढवणार असल्याचे बोलून दाखविले नसले तरी गेले महिनाभर भैरवनाथ शुगरची यंत्रणा भोसे जिल्हा परिषद गटात ऍक्टिव्ह झाली आहे. याशिवाय अनिल सावंत यांचे स्वीय सहाय्यक गेल्या अनेक दिवसांपासून भोसे जिल्हा परिषद गटातील गावांवर लक्ष ठेवून आहेत. त्यामुळे अनिल सावंत यांनी स्पष्ट संकेत दिले नसले तरी ते निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असल्याचे मात्र लपून राहिलेले नाही.

मंगळवेढा तालुक्यात काँग्रेस पक्षाला ज्यांच्या नेतृत्वामुळे सुवर्ण दिवस आले आहेत असे काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत साळे यांच्याही भूमिकेकडे सध्या लक्ष लागून राहिले आहे. याआधी त्यांचे आजोबा कै. बाबासाहेब साळे यांनी भोसे जिल्हा परिषद गटाचे नेतृत्व केले आहे. प्रशांत साळे यांनी निवडणूक लढविण्यासाठी संकेत जरी दिले नसले तरी आजपर्यंत नकारही दिला नाही. त्यामुळे ऐनवेळी त्यांची उमेदवारी येऊ शकते.

मंगळवेढा तालुका पंचायत समितीचे माजी सभापती तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य प्रदीप खांडेकर हे भोसे जिल्हा परिषद गटात निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असल्याची माहिती मिळत असून त्यांचे निकटवर्तीय चर्चांना दुजोरा देत आहेत. मंगळवेढा तालुक्यातील चर्चेतला आणि संयमी चेहरा अशी त्यांची ओळख आहे. सभापती असताना संपूर्ण मंगळवेढा तालुक्यात त्यांनी चांगल्या प्रकारे काम केले असल्यामुळे मंगळवेढा तालुक्यातील कोणत्याही जिल्हा परिषद गटात चालणारा चेहरा अशी त्यांची ओळख आहे.

श्री संत दामाजी कारखान्याचे संचालक भिवा दोलतडे आणि पंचायत समितीच्या माजी उपसभापती कै. इंदुबाई दोलतडे यांचे सुपुत्र, बागडेबाबा दूध संस्थेचे चेअरमन दादासाहेब दोलतडे हे भोसे जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवण्यासाठी आग्रही असल्याचे त्यांनी बोलून दाखविले आहे. तालुक्याच्या दक्षिण भागातील सर्व बाजूंनी सक्षम असणारे नेते अशी त्यांची ओळख आहे.

महायुती मधील घटक पक्ष असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकारी जिल्हाध्यक्ष रामेश्वर मासाळ हे भोसे जिल्हा परिषद गटात इच्छुक असल्याचे चर्चा वारंवार ऐकायला मिळत आहेत. महायुती करत असताना भोसे जिल्हा परिषद गट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडावा अशी आग्रही मागणी यांनी याआधी केली आहे. मंगळवेढा तालुक्यातील बहुजन समाजाचे मोठे नेतृत्व अशी त्यांची ओळख आहे.

मंगळवेढा तालुक्याचे दक्षिण भागातील ज्येष्ठ नेते तथा दामाजी कारखान्याचे संचालक सुरेश कोळेकर यांची सुपुत्र, काँग्रेस पक्षाचे प्रदेश सचिव एडवोकेट रविकिरण कोळेकर हे काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असल्याचे सांगत आहेत. , राजकारणाची बाळकडू घरातूनच मिळाल्यामुळे उच्चशिक्षित असणारे रविकिरण कोळेकर हे सर्वसामान्यांचे प्रश्न मांडताना दिसत आहेत. खासदार प्रणिती शिंदे यांच्या पाठबळावर निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहेत.

दामाजी कारखान्याचे संचालक बसवराज पाटील हे देखील निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असल्याच्या चर्चा वारंवार होत आहेत. दक्षिण भागातील अभ्यासू आणि चर्चेतला चेहरा अशी त्यांची ओळख आहे. याशिवाय बहुजन गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष एडवोकेट बापूसाहेब मेटकरी हे देखील निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहेत. सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर आवाज उठविणारा आणि बहुजन चेहरा अशी त्यांची ओळख आहे. याशिवाय पंचायत समितीसाठी भोसे पंचायत समिती गणातून भाजपा ओबीसी मोर्चाचे तालुकाध्यक्ष आकाश डांगे हे इच्छुक आहेत. आमदार समाधान आवताडे यांची कट्टर समर्थक बहुजन युवक चेहरा अशी त्यांची ओळख आहे. भोसे पंचायत समिती गणातून नंदेश्वरचे सुपुत्र दामाजी सलगर हे इच्छुक आहेत. तसेच धनाजी खडतरे, सुरेश कांबळे, दत्ता कांबळे या नावांची चर्चा देखील सध्या होत आहे.

जातीय समीकरणांबरोबर मूलभूत प्रश्न निवडणुकीतील प्रमुख मुद्दे
जातीय समीकरणे, वर्षानुवर्षे प्रलंबित असलेला पाणी प्रश्न, अनेक रस्त्यांचा प्रश्न, सर्वसामान्यांचे प्रश्न शेतकऱ्यांचे इतर प्रश्न हे या निवडणुकीतील प्रमुख मुद्दे असणार आहेत. याशिवाय महायुती विरुद्ध महाविकास आघाडी समविचारी आघाडी अशी निवडणूक होणार अशी जरी चर्चा असली तरी महायुती आणि महाविकास आघाडी किंवा समविचारी आघाडी यांच्यामध्ये आतापर्यंत कसलाही ताळमेळ दिसून आला नाही. निवडणुकीसाठी अत्यंत कमी कालावधी असल्यामुळे अगदी दोन दिवसात सर्व चित्रे स्पष्ट होतील. याकडे भोसे जिल्हा परिषद गटातील व तसेच संपूर्ण मंगळवेढा तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागून आहे हे मात्र नक्की.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नंदेश्वर ग्रामपंचायतीसाठी विकासाची दूरदृष्टी असलेला सरपंच हवा : दादासाहेब मळगे यांची मागणी

नंदेश्वर / प्रतिनिधी : मंगळवेढा तालुक्यातील महत्त्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या नंदेश्वर ग्रामपंचायतीच्या सर्वांगीण व शाश्वत विकासासाठी सक्षम, दूरदृष्टी असलेला आणि सर्वसमावेशक विचारांचा उमेदवार सरपंच पदासाठी...

अनिल सावंत स्वगृही शिवसेनेत परतणार ?? कार्यकर्ते म्हणताहेत जिथे सन्मान नाही तिथे राहूच नका.

मंगळवेढा / प्रतिनिधी : पंढरपूर–मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील राजकारणात सध्या भैरवनाथ शुगर उद्योग समूहाचे चेअरमन तथा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अनिल सावंत यांच्या भूमिकेबाबत...

बेलदार हॉस्पिटलमध्ये सर्पदंश झालेल्या रुग्णाला नवजीवन; डॉ. सचिन बेलदार आणि डॉ. अपेक्षा बेलदार यांचा...

मंगळवेढा / प्रतिनिधी : चार दिवसांपूर्वी सर्पदंशामुळे अत्यंत गंभीर अवस्थेत दाखल झालेल्या साठ वर्षीय रुग्णाला बेलदार हॉस्पिटलमधील डॉ. सचिन बेलदार आणि डॉ.अपेक्षा बेलदार यांच्या...

मंगळवेढ्याचे अस्थिरोगतज्ञ डॉ. नितीन चौंडे आरोग्यरत्न पुरस्काराने सन्मानित, सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव

नंदेश्वर / प्रतिनिधी : मंगळवेढा तालुक्यातील ख्यातनाम अस्थिरोग तज्ञ डॉ. नितीन चौंडे यांना साप्ताहिक रणयुग टाइम्सच्या वतीने प्रदान करण्यात येणाऱ्या “आरोग्यरत्न” या मानाच्या पुरस्काराने...

रणयुग टाईम्सने सत्यनिष्ठ, निर्भीड व संघर्षमय पत्रकारिता करत समाजात आपली वेगळी ओळख निर्माण केली ...

मंगळवेढा | प्रतिनिधी : साप्ताहिक रणयुग टाईम्स च्या १४ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात आमदार समाधान आवताडे यांनी मार्गदर्शन करत पत्रकारितेच्या भूमिकेवर सखोल भाष्य...

error: Content is protected !!