Homeआरोग्यबेलदार हॉस्पिटलमध्ये सर्पदंश झालेल्या रुग्णाला नवजीवन; डॉ. सचिन बेलदार आणि डॉ. अपेक्षा...

बेलदार हॉस्पिटलमध्ये सर्पदंश झालेल्या रुग्णाला नवजीवन; डॉ. सचिन बेलदार आणि डॉ. अपेक्षा बेलदार यांचा रुग्णाच्या कुटुंबीयांनी सत्कार करीत मानले आभार

मंगळवेढा / प्रतिनिधी : चार दिवसांपूर्वी सर्पदंशामुळे अत्यंत गंभीर अवस्थेत दाखल झालेल्या साठ वर्षीय रुग्णाला बेलदार हॉस्पिटलमधील डॉ. सचिन बेलदार आणि डॉ.अपेक्षा बेलदार यांच्या तत्पर आणि अथक प्रयत्नांमुळे नवजीवन मिळाले. या यशस्वी उपचारामुळे रुग्ण व त्याच्या नातेवाईकांनी डॉक्टरांचे आभार मानत त्यांचा सत्कार केला.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित रुग्णाला रात्री सुमारे अकरा वाजण्याच्या सुमारास घरी असताना पायाला सर्पदंश झाला. त्यानंतर त्याला पोटात जळजळ होणे, तोंड कोरडे पडणे, चेहरा, हात व पायाला सूज येणे तसेच घाम येणे अशी लक्षणे दिसू लागली. प्रकृती झपाट्याने बिघडत असल्याने त्याला तातडीने मंगळवेढा येथील बेलदार हॉस्पिटलमध्ये मध्यरात्री बारा वाजण्याच्या सुमारास दाखल करण्यात आले.

दाखल होताना रुग्णाची अवस्था अत्यंत चिंताजनक होती. त्याचा रक्तदाब (बीपी) लागत नव्हता आणि काही वेळातच तो बेशुद्ध झाला. अशा गंभीर परिस्थितीत डॉ. सचिन बेलदार आणि डॉ. अपेक्षा बेलदार यांनी प्रसंगावधान राखत त्वरित उपचार सुरू केले. जवळजवळ दोन तासांच्या सततच्या प्रयत्नांनंतर रुग्णाचा रक्तदाब हळूहळू स्थिर होऊ लागला.

त्यानंतरही डॉक्टरांनी सातत्याने निरीक्षण व उपचार सुरू ठेवले. सुमारे २४ तासांनंतर रुग्ण शुद्धीवर येऊ लागला आणि पुढील दोन दिवसांत त्याच्या प्रकृतीत लक्षणीय सुधारणा झाली. अखेरीस चार दिवसांत रुग्ण पूर्णपणे बरा झाला असून काल त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. या यशस्वी उपचारामुळे आनंदित झालेल्या रुग्णाच्या नातेवाईकांनी तसेच स्वतः रुग्णाने डॉ.सचिन बेलदार व डॉ. अपेक्षा बेलदार या दांपत्याचा सत्कार करून कृतज्ञता व्यक्त केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नंदेश्वर-जुनोनी रस्त्यालगतची धोकादायक विहीर बुजविण्यासाठी नंदेश्वर ग्रामपंचायतीने बोलाविली विशेष ग्रामसभा; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न...

नंदेश्वर | प्रतिनिधी : नंदेश्वर-जुनोनी रस्त्यालगत आणि नंदेश्वर गावाच्या हद्दीत असलेली धोकादायक विहीर तातडीने बुजविण्याच्या मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली. यासाठी नंदेश्वर ग्रामपंचायतीने विशेष...

मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेत मंगळवेढा तालुक्याचा दुग्धव्यवसाय समाविष्ट करा, जिल्हा परिषद सदस्य प्रदीप...

नंदेश्वर | प्रतिनिधी : महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या क्लस्टर धोरणात मंगळवेढा तालुक्याचा दुग्धव्यवसायाचा समावेश करावा, अशी मागणी...

नंदेश्वर ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, नंदेश्वर पोलीस स्टेशन, प्राथमिक आरोग्य केंद्रासह प्रलंबित प्रश्नांचे काय???

नंदेश्वर | प्रतिनिधी : नंदेश्वर ग्रामपंचायतीच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गावातील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले असून विविध राजकीय गट व नेतेमंडळींनी आपापल्या पातळीवर पूर्वतयारी...

मंगळवेढा तालुक्यातील “ही” शाळा सुरू असते बारा महिने, जिल्हा परिषद सदस्य प्रदीप खांडेकर यांची...

नंदेश्वर | प्रतिनिधी : जिल्हा परिषद शाळा बंडगरवाडी, नंदेश्वर या प्रशालेने बारा महिने नियमितपणे शाळा सुरू ठेवून एक आदर्श निर्माण केला असून, ग्रामीण भागातील...

मेल्यावर मदत करून काय उपयोग…मदत देण्याऐवजी त्याच निधीतून रस्त्याच्या कडेला असणाऱ्या धोकादायक विहिरींवर सुरक्षा...

नंदेश्वर | प्रतिनिधी : तांदुळवाडी येथे रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत वाहन कोसळून जवळपास चौदा प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झालेल्या घटनेनंतर शासनाने मृतांच्या नातेवाईकांना सुमारे ४०...

error: Content is protected !!