Homeराजकीयधनगर आरक्षणासाठी मुंबईत २१ तारखेला आंदोलनात धनगर समाजाच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी मतभेद विसरून...

धनगर आरक्षणासाठी मुंबईत २१ तारखेला आंदोलनात धनगर समाजाच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी मतभेद विसरून सहभागी होण्याचे आवाहन, अभिमान शिंदे, अंकुश गरंडे यांचे आवाहन

नंदेश्वर | प्रतिनिधी : धनगर समाजाच्या भविष्यासाठी आरक्षण हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न असून पुढील पिढ्यांचा विचार करून समाजातील सर्व नेते, कार्यकर्ते आणि बांधवांनी एकत्र येणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन नंदेश्वर येथील अभिमान शिंदे आणि अंकुश केरप्पा गरंडे यांनी केले. येत्या २१ तारखेला मुंबई येथे धनगर आरक्षणासाठी मोठे आंदोलन होणार असून या आंदोलनाचे नेतृत्व धनगर आरक्षणाचे नायक दीपक बोराडे करणार आहेत. या ऐतिहासिक आंदोलनात सर्वांनी मतभेद विसरून सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

धनगर समाज आजही शिक्षण, नोकरी, आरोग्य आणि विकासाच्या अनेक संधींपासून वंचित आहे. आरक्षणाच्या अभावामुळे समाजातील तरुण पिढीसमोर अनेक अडचणी उभ्या राहिल्या आहेत. त्यामुळे आरक्षणाचा प्रश्न हा केवळ आजचा नसून भविष्यातील पिढ्यांच्या प्रगतीशी थेट जोडलेला असल्याचे शिंदे आणि गरंडे यांनी स्पष्ट केले.ते पुढे म्हणाले की, समाजातील अंतर्गत मतभेद, वैयक्तिक मतभिन्नता बाजूला ठेवून एकसंघपणे आंदोलनात सहभागी होणे ही काळाची गरज आहे. एकजुटीचे सामर्थ्य दाखवले तरच शासनाचे लक्ष या ज्वलंत प्रश्नाकडे वेधले जाईल.

मुंबईत होणारे हे आंदोलन शांततेच्या मार्गाने, शिस्तबद्ध आणि लोकशाही पद्धतीने पार पडणार असल्याचेही त्यांनी सांगितले. या आंदोलनातून धनगर समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी ठोस भूमिका मांडली जाणार असून शासनाने तात्काळ निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात येणार आहे. धनगर समाजातील सर्व संघटना, कार्यकर्ते, युवक, महिला आणि ज्येष्ठांनी मोठ्या संख्येने मुंबईत उपस्थित राहून आंदोलन यशस्वी करावे, असे आवाहन शेवटी अभिमान शिंदे आणि अंकुश केरप्पा गरंडे यांनी केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नंदेश्वर ग्रामपंचायतीसाठी विकासाची दूरदृष्टी असलेला सरपंच हवा : दादासाहेब मळगे यांची मागणी

नंदेश्वर / प्रतिनिधी : मंगळवेढा तालुक्यातील महत्त्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या नंदेश्वर ग्रामपंचायतीच्या सर्वांगीण व शाश्वत विकासासाठी सक्षम, दूरदृष्टी असलेला आणि सर्वसमावेशक विचारांचा उमेदवार सरपंच पदासाठी...

अनिल सावंत स्वगृही शिवसेनेत परतणार ?? कार्यकर्ते म्हणताहेत जिथे सन्मान नाही तिथे राहूच नका.

मंगळवेढा / प्रतिनिधी : पंढरपूर–मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील राजकारणात सध्या भैरवनाथ शुगर उद्योग समूहाचे चेअरमन तथा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अनिल सावंत यांच्या भूमिकेबाबत...

बेलदार हॉस्पिटलमध्ये सर्पदंश झालेल्या रुग्णाला नवजीवन; डॉ. सचिन बेलदार आणि डॉ. अपेक्षा बेलदार यांचा...

मंगळवेढा / प्रतिनिधी : चार दिवसांपूर्वी सर्पदंशामुळे अत्यंत गंभीर अवस्थेत दाखल झालेल्या साठ वर्षीय रुग्णाला बेलदार हॉस्पिटलमधील डॉ. सचिन बेलदार आणि डॉ.अपेक्षा बेलदार यांच्या...

मंगळवेढ्याचे अस्थिरोगतज्ञ डॉ. नितीन चौंडे आरोग्यरत्न पुरस्काराने सन्मानित, सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव

नंदेश्वर / प्रतिनिधी : मंगळवेढा तालुक्यातील ख्यातनाम अस्थिरोग तज्ञ डॉ. नितीन चौंडे यांना साप्ताहिक रणयुग टाइम्सच्या वतीने प्रदान करण्यात येणाऱ्या “आरोग्यरत्न” या मानाच्या पुरस्काराने...

रणयुग टाईम्सने सत्यनिष्ठ, निर्भीड व संघर्षमय पत्रकारिता करत समाजात आपली वेगळी ओळख निर्माण केली ...

मंगळवेढा | प्रतिनिधी : साप्ताहिक रणयुग टाईम्स च्या १४ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात आमदार समाधान आवताडे यांनी मार्गदर्शन करत पत्रकारितेच्या भूमिकेवर सखोल भाष्य...

error: Content is protected !!