मंगळवेढा (प्रतिनिधी)
नंदेश्वर गावचे सुपुत्र ज्ञानेश्वर गरंडे यांची राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष ओबीसी सेलच्या तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. मंगळवेढा येथे झालेल्या पक्षाच्या कार्यकर्ता संवाद मेळाव्यात ही निवड जाहीर करण्यात आली.
मान्यवरांचे हस्ते निवडीचे पत्र…
यावेळी खासदार धैर्यशील मोहिते पाटील, माजी पालकमंत्री लक्ष्मणराव ढोबळे, जिल्हाध्यक्ष वसंत देशमुख तसेच राष्ट्रवादीचे नेते अनिल सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत गरंडे यांना निवडीचे पत्र प्रदान करण्यात आले.

राष्ट्रवादीचे विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविणार – ज्ञानेश्वर गरंडे
निवडीनंतर बोलताना नूतन तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर गरंडे म्हणाले, “पक्षाचे संस्थापक शरदचंद्र पवार साहेब यांच्या विचारधारेचा प्रसार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवून पक्षसंघटन अधिक बळकट करण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे.तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला चांगले दिवस आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू, असेही त्यांनी सांगितले. या निवडीबद्दल विविध स्तरातून ज्ञानेश्वर गरंडे यांचे अभिनंदन करण्यात येत असून पक्षात नवचैतन्य संचारले आहे.























