Homeसामाजिकलोहार समाज बहुउद्देशीय संस्थेचे पुरस्कार जाहीर, शिवनारायण पोपळकर यांना जीवन गौरव पुरस्कार,...

लोहार समाज बहुउद्देशीय संस्थेचे पुरस्कार जाहीर, शिवनारायण पोपळकर यांना जीवन गौरव पुरस्कार, डॉ. योगिता गुजर कलारत्न पुरस्कार व डॉ. अनिल लोहार ज्ञानज्योती पुरस्काराने सन्मानित, प्रल्हाद नवगण यांनी पटकावला उद्योगरत्न पुरस्कार.

भोसरी (पुणे) : लोहार समाज बहुउद्देशीय संस्थेच्या* वतीने दरवर्षी दिला जाणारा जीवन गौरव पुरस्कार या वर्षी म्हसला बु.(जि.बुलढाना) येथील हरि ओम मागासवर्गीय शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक व निवासी अनाथ व मतिमंद मुलांच्या शाळेचे संचालक शिवनारायण केशव पोफळकर (बुलढाणा) यांना जाहीर झाला आहे.

संस्थेच्या वतीने दिल्या जाणारा पहिला कलारत्न पुरस्कार यवतमाळ येथील नादब्रह्म संगीत विद्यालयाच्या संचालक डॉ योगिता गणेश गुजर(यवतमाळ)यांना जाहीर झाला आहे. त्याचप्रमाणे संस्थेच्या वतीने दिला जाणारा पहिला ज्ञानज्योती पुरस्कार उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील प्रा डॉ अनिल जगन्नाथ लोहार(जळगाव ) यांना दिला जाणारा आहे. संस्थेच्या वतीने दरवर्षी उद्योजकांना दिला जाणारा उद्योग रत्न पुरस्कार या वर्षी अकलुज( जि.सोलापूर) येथील उद्योजक श्री प्रल्हाद अंबादास नवगण यांनी पटकावला.

डिसेंबर महिन्यात संस्थेच्या वतीने या पुरस्कारांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले होते. या पुरस्कारासाठी संस्थेचे निवड समितीने केलेल्या शिफारशीनुसार संस्थेने वरील मान्यवरांची शैक्षणिक पात्रता, अनुभव आणि अनुक्रमे सामाजिक, कला, शिक्षण, उद्योग क्षेत्रातील सहभाग लक्षात घेऊन त्यांची लोहार समाज बहुउद्देशीय संस्था जीवन गौरव, कलारत्न, ज्ञानज्योती, उद्योगरत्न पुरस्कारांसाठी निवड केली आहे. संस्थेचे वतीने अध्यक्ष बाळासाहेब शेलार यांनी त्यांचे अभिनंदन केले.
संस्थेच्या वतीने रविवार दि.१ फेब्रुवारी २०२६ रोजी भोसरी (पिंपरी चिंचवड) येथील गोविंद गार्डन मंगल कार्यालयात होणाऱ्या विश्वकर्मा जयंती महोत्सवात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सदर पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.

संस्थेच्या वतीने दिला जाणारा हा सहावा जीवन गौरव पुरस्कार आहे. यापुर्वी अखिल महाराष्ट्र गाडी लोहार महासंघाचे कै.उत्तमराव पडघमकर व निवृत्त न्यायाधीश श्री दत्तात्रेय सम्राट, नागपूर येथील डॉ वसंतराव साळवणकर व कल्याण येथील गाडी लोहार समाज उन्नती मंडळाचे ॲड.युवराज लोहार, श्री कैलाश लोहार या प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. रोख रक्कम रूपये ५००१ , ट्रॉफी, सन्मान पत्र, शॉल, श्रीफळ, असे जीवन गौरव पुरस्काराचे स्वरूप आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भोसे गावात भाजपला मोठे बळ; शेकडो कार्यकर्त्यांचा प्रदीप खांडेकर आणि आप्पासो निकम यांना पाठिंबा

भोसे/ प्रतिनिधी : भोसे (ता. मंगळवेढा) येथे भाजपला मोठे बळ मिळाले असून भोसे गावातील दत्ता ताटे यांचेसह शेकडो कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश...

भोसे जिल्हा परिषद गटात भाजप उमेदवार प्रदीप खांडेकर यांना सर्व स्तरातून पाठिंबा, भोसे गटातील...

भोसे | प्रतिनिधी : भोसे जिल्हा परिषद गटाचे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार प्रदीप खांडेकर यांना सर्व स्तरातून मोठ्या प्रमाणावर पाठिंबा वाढत असल्याचे चित्र सध्या...

भोसे जि.प.गटात खरी लढत भाजप आणि वंचित आघाडीतच आहे, वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते...

नंदेश्वर (प्रतिनिधी) : आजपर्यंत धनदांडग्यांना निवडून दिले; मात्र सर्वसामान्यांचे प्रश्न वर्षानुवर्षे तसेच प्रलंबित राहिले आहेत. आता एकदा गरिबांच्या पोरांना संधी देऊन पाहा, तुमचे प्रश्न...

भोसे जिल्हा परिषद गटात धनशक्तीविरोधात जनशक्तीचा लढा; वंचित आघाडीच्या बापूसाहेब मेटकरींनी दंड थोपटले

भोसे / विशेष प्रतिनिधी : मंगळवेढा तालुक्यातील भोसे जिल्हा परिषद गटात यावेळी निवडणुकीची लढत चांगलीच रंगतदार झाली असून, धनवान उमेदवारांच्या विरोधात सर्वसामान्य जनतेच्या जोरावर...

बसवराज पाटील यांच्या होम ग्राउंडवर प्रदीप खांडेकर यांच्या प्रचारसभेला उत्स्फूर्त प्रतिसाद; भोसे गटात राजकीय...

मारोळी (प्रतिनिधी) : भोसे जिल्हा परिषद गटासाठी होत असलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाचे उमेदवार प्रदीप खांडेकर यांच्या प्रचाराला वेग आला असून, मारोळी गावात...

error: Content is protected !!