नंदेश्वर (प्रतिनिधी) नंदेश्वर ता.मंगळवेढा येथे भारतीय स्वातंत्र्याचे आद्यप्रणेते राजे यशवंतराव होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते धनाजी गडदे यांच्या पुढाकाराने माजी सरपंच गेना दोलतडे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.
सुरुवातीला माजी उपसरपंच राहुल कसबे यांचे हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी अंकुश गरंडे, चेतना पतसंस्थेचे वसुली अधिकारी आण्णासाहेब बंडगर, रामभाऊ दोलतडे, आबासाहेब दोलतडे, समाधान गरंडे यांचे सह अनेक नागरिक यावेळी उपस्थित होते.
