Homeराजकीयकाँग्रेसचे भोसे पं. स. गणाचे उमेदवार प्रवीण मेटकरी यांच्या उमेदवारीमुळे तीर्थक्षेत्र विकास...

काँग्रेसचे भोसे पं. स. गणाचे उमेदवार प्रवीण मेटकरी यांच्या उमेदवारीमुळे तीर्थक्षेत्र विकास आघाडीला मिळाले बळ, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत साळे यांच्या मार्गदर्शनाखाली भोसे जि.प. गटात काँग्रेस कार्यकर्ते प्रचारात आघाडीवर

भोसे / विशेष प्रतिनिधी : मंगळवेढा तालुक्यातील भोसे जिल्हा परिषद गटात यावेळी अत्यंत चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. भारतीय जनता पक्षाचे उमेदवार प्रदीप खांडेकर आणि तीर्थक्षेत्र विकास आघाडी–काँग्रेस युतीचे उमेदवार बसवराज पाटील यांच्यात थेट सामना होत असून, दोन्ही बाजूंनी जोरदार तयारी सुरू असल्याने निवडणूक रंगतदार होणार असल्याचे चित्र आहे.

दरम्यान, भोसे पंचायत समिती गणात भाजपच्या वतीने आप्पासो निकम यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर तीर्थक्षेत्र विकास आघाडी आणि काँग्रेस युतीमध्ये हा गण काँग्रेसच्या वाट्याला आला असून, काँग्रेसकडून शिक्षक नेते ज्ञानेश्वर मेटकरी आणि सोलापूर जिल्हा परिषदेच्या माजी महिला व बालकल्याण सभापती रतन ज्ञानेश्वर मेटकरी यांचे सुपुत्र प्रवीण मेटकरी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून अडचणीत सापडलेल्या काँग्रेस पक्षाला मंगळवेढा तालुक्यात पुन्हा उभारी देण्याचे काम विद्यमान कर्तव्यदक्ष तालुकाध्यक्ष प्रशांत साळे यांनी केले आहे. तालुकाध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळताना त्यांनी संघटन मजबूत करत काँग्रेस पक्षाला पुन्हा ‘सोन्याचे दिवस’ दाखवले, अशी चर्चा कार्यकर्त्यांमध्ये आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखालीच प्रवीण मेटकरी यांना उमेदवारी देण्यात आल्याने काँग्रेस व युतीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. प्रशांत साळे यांचे मंगळवेढा तालुक्याच्या दक्षिण भागात मोठे राजकीय प्रस्थ आहे. हुन्नूर हे त्यांचे मूळ गाव असून, हुन्नूरसह भोसे पंचायत समिती गणातील अनेक गावांमध्ये त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे या संपूर्ण परिसरात प्रवीण मेटकरी यांना आणि पर्यायाने तीर्थक्षेत्र विकास आघाडीला काँग्रेस पक्षाचा मोठा फायदा होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

याशिवाय शिक्षक नेते ज्ञानेश्वर मेटकरी हे मंगळवेढा तालुक्याच्या दक्षिण भागातील अभ्यासू, संयमी आणि चाणाक्ष नेते म्हणून ओळखले जातात. त्यांचा या भागात मोठा जनसंपर्क असून शिक्षक, पालक व सर्वसामान्य नागरिकांमध्ये त्यांचा प्रभाव आहे. त्यांच्या सामाजिक आणि शैक्षणिक कार्याचा लाभ प्रवीण मेटकरी यांच्या उमेदवारीला मिळत असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे धनगर समाजाचे प्राबल्य असलेल्या भोसे जिल्हा परिषद गटात प्रवीण मेटकरी यांच्या उमेदवारीमुळे तीर्थक्षेत्र विकास आघाडीला, तसेच जिल्हा परिषद गटातील उमेदवार बसवराज पाटील यांना मोठा फायदा होणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे भोसे जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गण या दोन्ही ठिकाणी यावेळी निवडणूक अत्यंत अटीतटीची होण्याची चिन्हे आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मंगळवेढ्यात आरोग्यसेवेचा नवा आधारवड बेलदार हॉस्पिटल, अल्पावधीतच ठरले विश्वासार्ह

मंगळवेढा / प्रतिनिधी : मंगळवेढा तालुक्यात आरोग्यसेवेच्या क्षेत्रात अल्पावधीतच ठसा उमटवणारे बेलदार हॉस्पिटल सध्या रुग्णांसाठी आशेचा किरण ठरत आहे. उद्घाटनानंतर अवघ्या दोन महिन्यांच्या कालावधीत...

नंदेश्वर व परिसरातील खाद्यप्रेमींसाठी दोस्ती चायनीज सेंटर सेवेत, उद्घाटन सोहळा दिमाखात संपन्न

नंदेश्वर / प्रतिनिधी : नंदेश्वर (ता. मंगळवेढा) येथील खाद्यप्रेमींसाठी आनंदाची बातमी ठरावी, अशा वातावरणात दोस्ती चायनीज सेंटरचे उद्घाटन उत्साहात व मोठ्या थाटामाटात पार पडले....

माळशिरस येथील प्रभू विश्वकर्मा मंदिराच्या जागेवरून वाद चिघळला; लोहार समाज आक्रमक, राज्यभर आंदोलनांची लाट

माळशिरस / प्रतिनिधी : लोहार समाजाचे आराध्य दैवत असलेल्या प्रभु विश्वकर्मा मंदिरासाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या जागेवरून माळशिरस येथे मोठा वाद निर्माण झाला असून,...

बापूसाहेब आडसूळ यांचा लोहार समाज संघटनेच्या वतीने सत्कार

सोलापूर / प्रतिनिधी : एकनाथ स्वाभिमानी शिक्षककर्मचारी पतसंस्थाच्या चेअरमनपदी बापूसाहेब आडसूळ यांची निवड झाल्याबद्दल लोहार समाजाच्या वतीने त्यांचा सत्कार करून अभिनंदन करण्यात आले. समाजातील...

नंदेश्वर येथे वनपरिक्षेत्रातील वनराईला भीषण आग; अनेक वृक्ष जळून खाक, सुस्त वनविभाग कधी जागा...

नंदेश्वर / प्रतिनिधी : नंदेश्वर येथील वनपरिक्षेत्रातील वनराईला गुरुवार दि. ४ मार्च रोजी पहाटेच्या सुमारास अचानक भीषण आग लागल्याची घटना उघडकीस आली. पहाटेच्या वेळी...

error: Content is protected !!