सोलापूर आजतक न्यूज नेटवर्क
श्री बाळकृष्ण विद्यालयातील विद्यार्थ्यांनी स्वप्नाली नामदेव गरंडे व त्रिदेवी मनोहर गरंडे यांची राज्य स्तरीय कबड्डी असोसिएशन स्पर्धेसाठी निवड झाली आहे. सोलापूर जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने श्रीराम स्पोर्ट्स क्लब यांच्या वतीने सोलापूर जिल्हा ५२ वी कुमार/कुमारी गट मुले/मुली सोलापूर जिल्हाअजिंक्य निवड चाचणी कबड्डी स्पर्धा. दिनांक १५ रोजी, ठिकाण पार्कस्टेडियम ( इंदिरा गांधी स्टेडियम) क्रीडांगणावर आयोजित करण्यात आलेल्या होत्या. सदर स्पर्धेत आपल्या श्री बाळकृष्ण विद्यालय नंदेश्वर संघाने सहभाग घेतला होता.

सर्व स्तरातून कौतुक…
आनंदाची आणि अभिमानाची बाब म्हणजे आपल्या विद्यालयातील विद्यार्थिनी कुमारी स्वप्नाली नामदेव गरंडे व कुमारी त्रिदेवी मनोहर गरंडे यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत सोलापूर जिल्हा कबड्डी कॅम्प टॉप २० मध्ये स्थान पटकावले आहे. या टॉप २० मुलींची सोलापूर या ठिकाणी पंधरा दिवसाचे सराव शिबिर होईल त्या सराव शिबिरामधून टॉप १४ मुलींची पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी निवड केली जाणार आहे. आपल्या प्रशालेतील मुलींनी अतिशय जिगरबाज आणि उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत उपस्थित प्रेक्षकांचे मने जिंकली.या यशाबद्दल प्रशालेचे मुख्याध्यापक विठ्ठल निवृत्ती एकमल्ली यांनी यशस्वी विद्यार्थिनी व क्रिडा शिक्षक मनोहर बंडगर, मार्गदर्शक शिक्षक नवनाथ मेटकरी यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.























