मंगळवेढा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने मंगळवेढा तालुक्यातील व शहरातील विविध मागण्याच्या संदर्भात महाराष्ट्र राज्य परिवहन विभाग मंगळवेढा पोलीस स्टेशन मंगळवेढा महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मंगळवेढा या ठिकाणी पक्षाच्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने निवेदन देण्यात आले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाच्या वतीने मंगळवेढा तालुक्यातील ग्रामीण भागात एसटी बसची व्यवस्था वेळेवर होत नसल्याने प्रवासी नागरिकांना व विद्यार्थ्यांना मंगळवेढा येथे ये जा करण्यासाठी अडचणी येत आहेत ती अडचण दूर करावी व मंगळवेढा विभागातील एसटी बसेस ना दुरुस्त व खराब असल्यामुळे प्रवाशांना प्रवास करणे धोकादायक वाटत आहे त्या बसेसची दुरुस्ती करावी व नवीन बस ची मागणी करावी बस स्थानकातील काम गेल्या अनेक दिवसापासून चालू असून ते लवकरात लवकर पूर्ण करावे या मागण्याची निवेदन आगार व्यवस्थापक संजय भोसले यांच्याकडे देण्यात आले
अवैध व्यवसायांचे मोठ्या प्रमाणात
तसेच मंगळवेढा तालुका व शहरांमध्ये अवैद्य धंद्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले असून तालुक्यांमध्ये खुले आम अवैध दारू विक्री जुगार मटका मोठ्या प्रमाणात सुरू असून या अवैध्य व्यवसायावर कडक कारवाई करण्यात यावी त्याचबरोबर तालुक्यामध्ये खोट्या केसेसचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे याबाबत आपण गांभीर्यपूर्वक विचार करून कोणात्याही राजकीय दबावाला बळी न पडता योग्य तेच काम पोलीस प्रशासनाणे करावे या मागणीचे निवेदन मंगळवेढा पोलीस स्टेशन येथे देण्यात आले.
तसेच मंगळवेढा शहरातील व ग्रामीण भागातील वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा सुरळीत करण्यात यावा व मंगळवेढा शहरातील दुरुस्तीचे काम व सब स्टेशन मध्ये काही बिघाड झाल्यास संपूर्ण शहराचा वीज पुरवठा खंडित केला जातो यावरती पर्यायी व्यवस्था म्हणून मारापुर आंधळगाव एमआयडीसी मंगळवेढा या लगतच्या सबस्टेशन मधून पर्यायी व्यवस्था निर्माण करण्यात यावी सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असल्यामुळे शहरांमधील व ग्रामीण भागामधील वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा थांबवण्यात यावा या मागणीचे निवेदन महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण विभाग मंगळवेढा यांना देण्यात आले
दिलेल्या सर्व मागण्याची वेळेवर अंमलबजावणी करावी व तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांना व शेतकऱ्यांना योग्य तो न्याय देण्यात यावा अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने मोठ्या स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा संबंधित विभागाला देण्यात आला
यावेळी माजी पालकमंत्री लक्ष्मणराव ढोबळे, भैरवनाथ शुगरचे उपाध्यक्ष अनिल सावंत, प्रांतिक सदस्य राहुल शहा शहराध्यक्ष चंद्रशेखर कोंडुभैरी, तालुकाध्यक्ष प्रथमेश पाटील, संतोष रंधवे, माणिक गुंगे, सुरेश कांबळे, जमीर इनामदार, संभाजी भोसले, स्मिता अवघडे, संदेश काळुंगे, संजय मस्के, सागर गुरव, कृष्णा लोंढे, रमेश पवार, अजिंक्य बेद्रे, विलास पाराधे, वाल्मीक लोखंडे व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे मंगळवेढा तालुक्यातील व शहरातील अनेक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.शुभेच्छुक कष्टांगी मित्रपरिवार
सोलापूर आजतक न्यूज नेटवर्क..
महाराष्ट्रातील अग्रगण्य आणि नावाजलेल्या औद्योगिक समूहांपैकी एक असलेल्या भैरवनाथ शुगर उद्योग समूहाच्या चेअरमनपदी अनिल सावंत यांची नुकतीच निवड करण्यात आली...
सोलापूर आजतक न्यूज नेटवर्क..
ग्रामीण भागात पतसंस्थांचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत असून, त्या केवळ आर्थिक मदत करणाऱ्या संस्था नसून सामाजिक व आर्थिक विकासाच्या केंद्रबिंदू ठरत आहेत....
सोलापूर आजतक न्यूज नेटवर्क..
महाराष्ट्रातील अग्रगण्य आणि नावाजलेल्या औद्योगिक समूहांपैकी एक असलेल्या भैरवनाथ शुगर उद्योग समूहाच्या चेअरमनपदी अनिल सावंत यांची नुकतीच निवड करण्यात आली...
सोलापूर आजतक न्यूज नेटवर्क..
ग्रामीण भागात पतसंस्थांचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत असून, त्या केवळ आर्थिक मदत करणाऱ्या संस्था नसून सामाजिक व आर्थिक विकासाच्या केंद्रबिंदू ठरत आहेत....