Homeराजकीयभोसे जि.प.गटात खरी लढत भाजप आणि वंचित आघाडीतच आहे, वंचित बहुजन आघाडीचे...

भोसे जि.प.गटात खरी लढत भाजप आणि वंचित आघाडीतच आहे, वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते तथा जामखेडचे नगरसेवक अरुण जाधव यांचे प्रतिपादन, ॲड.बापूसाहेब मेटकरी यांच्या प्रचारार्थ नंदेश्वरात सभा

नंदेश्वर (प्रतिनिधी) : आजपर्यंत धनदांडग्यांना निवडून दिले; मात्र सर्वसामान्यांचे प्रश्न वर्षानुवर्षे तसेच प्रलंबित राहिले आहेत. आता एकदा गरिबांच्या पोरांना संधी देऊन पाहा, तुमचे प्रश्न नक्कीच सुटतील, असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते तथा जामखेडचे नगरसेवक अरुण जाधव यांनी केले. भोसे जिल्हा परिषद गटातील बहुजन वंचित आघाडीचे उमेदवार ॲड. बापूसाहेब मेटकरी यांच्या प्रचारार्थ नंदेश्वर येथे आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

अरुण जाधव पुढे म्हणाले की, भोसे जिल्हा परिषद गटात खरी लढत ही भाजप आणि बहुजन वंचित आघाडीमध्ये आहे. बहुजन वंचित आघाडीने सर्वसामान्यांच्या मूलभूत प्रश्नांवर सातत्याने आवाज उठविणारा, संघर्षातून घडलेला उमेदवार या गटाला दिला आहे. पाणी प्रश्न, विविध समाजांच्या आरक्षणाचा प्रश्न, तसेच महापुरुषांच्या जयंती व विचारांचा प्रचार–प्रसार असो, प्रत्येक ठिकाणी बापूसाहेब मेटकरी हे आघाडीवर असलेले कार्यकर्ते आहेत. अशा कार्यकर्त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे ही काळाची गरज आहे, असेही जाधव यांनी स्पष्ट केले.

यावेळी उमेदवार ॲड. बापूसाहेब मेटकरी यांनीही उपस्थितांना संबोधित केले. ते म्हणाले की, मंगळवेढा तालुक्यातील दुष्काळी व कोरडवाहू भागातील गावांचे प्रश्न असोत किंवा २४ गावांच्या मंगळवेढा उपसा सिंचन योजनेसाठीचा संघर्ष असो, या सर्व लढ्यांमध्ये मी कायम सक्रिय भूमिका घेतली आहे, हे या भागातील जनतेला चांगलेच माहिती आहे.

मंगळवेढा तालुक्यात पूर्वी केवळ नंदेश्वर गावात आणि मंगळवेढा शहरातच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी होत होती. मात्र राष्ट्रीय समाज पक्षात कार्यरत असताना गावोगावी, वाड्या-वस्त्यांवर अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी व्हावी यासाठी मी विशेष प्रयत्न केले. समाजाच्या इतिहासाची जपणूक आणि महापुरुषांचे विचार तळागाळात पोहोचवणे हे माझे कायमचे उद्दिष्ट राहिले आहे. मला एकदा संधी द्या. त्या संधीचे मी सोने करीन. तुमचे प्रश्न सोडवण्यात अपयशी ठरलो, तर पुन्हा या भागात तोंड दाखवणार नाही, असे ठाम आश्वासन देत बापूसाहेब मेटकरी यांनी मतदारांना साद घातली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भोसे गावात भाजपला मोठे बळ; शेकडो कार्यकर्त्यांचा प्रदीप खांडेकर आणि आप्पासो निकम यांना पाठिंबा

भोसे/ प्रतिनिधी : भोसे (ता. मंगळवेढा) येथे भाजपला मोठे बळ मिळाले असून भोसे गावातील दत्ता ताटे यांचेसह शेकडो कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश...

भोसे जिल्हा परिषद गटात भाजप उमेदवार प्रदीप खांडेकर यांना सर्व स्तरातून पाठिंबा, भोसे गटातील...

भोसे | प्रतिनिधी : भोसे जिल्हा परिषद गटाचे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार प्रदीप खांडेकर यांना सर्व स्तरातून मोठ्या प्रमाणावर पाठिंबा वाढत असल्याचे चित्र सध्या...

भोसे जिल्हा परिषद गटात धनशक्तीविरोधात जनशक्तीचा लढा; वंचित आघाडीच्या बापूसाहेब मेटकरींनी दंड थोपटले

भोसे / विशेष प्रतिनिधी : मंगळवेढा तालुक्यातील भोसे जिल्हा परिषद गटात यावेळी निवडणुकीची लढत चांगलीच रंगतदार झाली असून, धनवान उमेदवारांच्या विरोधात सर्वसामान्य जनतेच्या जोरावर...

बसवराज पाटील यांच्या होम ग्राउंडवर प्रदीप खांडेकर यांच्या प्रचारसभेला उत्स्फूर्त प्रतिसाद; भोसे गटात राजकीय...

मारोळी (प्रतिनिधी) : भोसे जिल्हा परिषद गटासाठी होत असलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाचे उमेदवार प्रदीप खांडेकर यांच्या प्रचाराला वेग आला असून, मारोळी गावात...

निष्ठावान कार्यकर्त्याची शिष्टाई अखेर यशस्वी, भोसे गटासह मंगळवेढा तालुक्यातील चारही गटात अनिल सावंत यांचा...

लवंगी/ विशेष प्रतिनिधी : मंगळवेढा तालुक्यातील राजकीय घडामोडींना आज महत्त्वाचा कलाटणी मिळाली असून भैरवनाथ शुगरचे चेअरमन तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) चे नेते...

error: Content is protected !!