Homeसामाजिकभोसे जिल्हा परिषद गटात धनशक्तीविरोधात जनशक्तीचा लढा; वंचित आघाडीच्या बापूसाहेब मेटकरींनी दंड...

भोसे जिल्हा परिषद गटात धनशक्तीविरोधात जनशक्तीचा लढा; वंचित आघाडीच्या बापूसाहेब मेटकरींनी दंड थोपटले

भोसे / विशेष प्रतिनिधी : मंगळवेढा तालुक्यातील भोसे जिल्हा परिषद गटात यावेळी निवडणुकीची लढत चांगलीच रंगतदार झाली असून, धनवान उमेदवारांच्या विरोधात सर्वसामान्य जनतेच्या जोरावर निवडणूक लढवणाऱ्या वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराने दंड थोपटले आहेत. या गटात भाजपच्या वतीने माजी सभापती प्रदीप खांडेकर आणि दामाजी सहकारी साखर कारखान्याचे संचालक बसवराज पाटील हे दोन प्रभावशाली व आर्थिकदृष्ट्या सक्षम उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने बहुजन गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. बापूसाहेब मेटकरी यांनी निवडणुकीत उडी घेतली आहे.

ॲड. बापूसाहेब मेटकरी हे सर्वसामान्य कुटुंबातून पुढे आलेले असून, एक निष्ठावान चळवळीतील कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे. समाजातील वंचित, उपेक्षित आणि बहुजन घटकांसाठी सातत्याने लढा देणारे नेतृत्व म्हणून त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. “समोर उभे असलेले दोन्ही उमेदवार धनवान आहेत. मात्र मी जनतेच्या जीवावर, जनतेच्या विश्वासावर आणि कार्यकर्त्यांच्या ताकदीवर ही निवडणूक लढवत आहे,” असे मत बापूसाहेब मेटकरी यांनी व्यक्त केले.
मंगळवेढा तालुक्यातील दुष्काळी परिस्थिती, विशेषतः २४ गावांच्या पाणीप्रश्नासाठी त्यांनी केलेला संघर्ष आजही नागरिकांच्या स्मरणात आहे. पाण्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करणे, प्रशासनाशी थेट संघर्ष करणे आणि शेतकरी व कष्टकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, ही त्यांची ओळख बनली आहे. बहुजनांचा लढा हीच त्यांची भूमिका असून, सत्ता आणि पैशाच्या जोरावर नव्हे तर जनसामान्यांच्या प्रश्नांवर आधारित राजकारण करण्यावर त्यांचा ठाम विश्वास आहे.

सर्वसामान्य नागरिकांमध्ये मिसळून वागणारा, त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होणारा आणि थेट संवाद साधणारा उमेदवार म्हणून बापूसाहेब मेटकरी यांना मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळताना दिसत आहे. जिल्हा परिषद ही विकासाची कणा आहे. इथे बसणारा प्रतिनिधी जनतेतून आलेला, जनतेसाठी झगडणारा असावा, अशी भावना व्यक्त करत ते मतदारांपर्यंत पोहोचत आहेत. भोसे जिल्हा परिषद गटातील ही निवडणूक केवळ दोन-तीन उमेदवारांमधील स्पर्धा नसून, धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी खरी लढाई असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. या लढतीत मतदार कोणाच्या पारड्यात कौल देतात, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मंगळवेढा तालुक्याच्या दुष्काळी भागातील जनतेच्या अस्तित्वावर पुन्हा प्रश्नचिन्ह, पावसाने पाठ फिरवल्याने शेतीसह दुग्ध व्यवसाय...

0
नंदेश्वर / बाबासाहेब सासणे सोलापूर जिल्ह्यासह संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात यंदा पावसाने मोठी दडी मारल्याने ग्रामीण भागात दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. विशेषतः मंगळवेढा तालुक्याच्या...

भैरवनाथाची साखर कारखानदारीनंतर आता दुग्ध व्यवसायात एन्ट्री,भैरवनाथ शुगर उद्योग समूहाचे चेअरमन अनिल सावंत...

0
मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी साखर कारखानदारीच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणारे भैरवनाथ शुगर उद्योग समूहाचे चेअरमन अनिल सावंत आता दुग्ध व्यवसाय...

मंगळवेढा तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; तातडीने उपाययोजना व मदत द्या, बहुजन गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष...

मंगळवेढा / प्रतिनिधी : मंगळवेढा तालुक्यात यंदा पावसाचे अत्यल्प प्रमाण राहिल्याने शेतकरी, शेतमजूर, पशुपालक तसेच सर्वसामान्य नागरिक मोठ्या संकटात सापडले आहेत. तालुक्यात अनेक ठिकाणी...

धनगर समाजाच्या ST आरक्षणासाठी मंगळवेढ्यात तहसीलदारांना निवेदन, आश्वासनाची पूर्तता करून तातडीने निर्णय घेण्याची मागणी;...

मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी धनगर समाजाच्या अनुसूचित जमाती (ST) आरक्षणाची तातडीने अंमलबजावणी करावी, तसेच या प्रश्नावर शासनाने ठोस व निर्णायक भूमिका घ्यावी, या मागणीसाठी सकल...

कै. सौ. इंदुबाई (नानी) दोलतडे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम

नंदेश्वर / प्रतिनिधी : मंगळवेढा तालुका पंचायत समितीच्या माजी उपसभापती तथा दामाजी कारखान्याचे संचालक भिवा दोलतडे यांच्या सुविद्य पत्नी कै.सौ. इंदुबाई (नानी) भिवा दोलतडे...

error: Content is protected !!