नंदेश्वर/शामराजे लोहार
नंदेश्वर ता.मंगळवेढा येथे श्री कोंडीराम महाराज यांच्या पुण्यतिथी सप्ताह सोहळा उत्साहात संपन्न होत आहे. आज सायंकाळी ठीक पाच वाजता श्री कोंडीराम महाराज यांच्या पालखीचे मिरवणूक निघणार असल्याची माहिती कोंडीराम महाराज सेवा मंडळाच्या वतीने देण्यात आली आहे. शुक्रवार दिनांक 5 सप्टेंबर पासून विनापूजन होऊन सप्ताह सोहळ्यास सुरुवात झाली आहे.
नामज्योत दाखल झाल्यानंतर निघणार मिरवणूक…
शनिवार दि.६ रोजी नंदेश्वर येथील भाविक भक्त श्रीक्षेत्र इंचगिरी येथे नामज्योत आणण्यासाठी गेले होते. नामज्योत घेऊन भाविक भक्त आज सायंकाळी नंदेश्वर येथे दाखल होतील आणि यानंतर श्री कोंडीराम महाराज यांच्या पालखीचे भव्य मिरवणूक नंदेश्वर नगरीतून निघणार आहे. आज रविवार दिनांक सात रोजी श्रीधर पाटील आणि श्रीकांत पाटील यांचे प्रवचन होईल. श्रीधर पाटील केरळ ही या दिवशीच्या अन्नदाते असणार आहेत.
सोमवारी पुष्पवृष्टीने होणार सप्ताह सोहळ्याची सांगता….
सोमवार दि.८ रोजी सकाळी आठ ते नऊ संगीत भजन होईल. सकाळी १० वा.पासून श्रीक्षेत्र इंचगिरी मठाचे मठाधिपती रेवणसिद्ध महाराज, कोंडीराम महाराज मठाचे मठाधिपती श्री तुकाराम महाराज, अंबन्ना महाराज वळसंग या प्रमुख प्रवचनकारांसहित बजरंग फडतरे महाराज, विवेकानंद आरळी महाराज, दुधगे गुरुजी महाराज, देविदास महाराज, नवनाथ भंडारे महाराज, दत्तात्रय महाराज गुलबर्गा, ईश्वर सागर महाराज, सुभाष बोचरे महाराज, पुरुषोत्तम लवटे महाराज, सुनिता लवटे महाराज तनाळी, अभिमन्यू कांबळे महाराज, शशिकांत शिवनूर महाराज, व्हनमराठे सर महाराज, शिवाजी महाराज तनाळी यांचेही प्रवचन होईल. संपूर्ण सप्ताह काळात महिपती मोरे महाराज हाजापूर, जालिंदर चौगुले महाराज महिम, हरी घाडगे महाराज महिम आणि यानंतर ठीक बारा वाजता पुष्पवृष्टी होऊन महाप्रसादानंतर या पुण्यतिथी सप्ताह सोडण्याची सांगता करण्यात येणार आहे. शेवटच्या दिवशी बसवराज गोलभावे हे अन्नदाते असतील.
