सोलापूर आजतक न्यूज नेटवर्क ✍️ ✍️ ✍️
मंगळवेढा तालुका काँग्रेस कमिटीच्या तालुका उपाध्यक्षपदी नंदेश्वर येथील बजरंग चौगुले यांची फेर निवड करण्यात आली आहे. तसेच तालुका सरचिटणीसपदी नंदेश्वर येथीलच आबासाहेब पाटील आणि नामदेव डांगे यांची निवड करण्यात आली आहे. नंदेश्वर येथे आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने विचार विनिमय बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत वरील तिघांची निवड करण्यात आली व सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते त्यांना निवडीचे पत्र देण्यात आले. काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत साळे यांच्या शिफारसीने बजरंग चौगुले, आबासाहेब पाटील आणि नामदेव डांगे यांची निवड करण्यात आली आहे.
निवडणुका व पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी चांगले योगदान
गत लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत बजरंग चौगुले, आबासाहेब पाटील आणि नामदेव डांगे यांनी अत्यंत चांगल्या प्रकारे काँग्रेस पक्षाचे काम केले आहे. तसेच पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी आजपर्यंत अत्यंत चांगल्या प्रकारे योगदान दिल्यामुळे त्यांच्या या सर्व कार्याची दखल घेऊन त्यांना पक्ष संघटनेत संधी देण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.























