सोलापूर आजतक न्यूज नेटवर्क..
भाजप नेते तथा नंदेश्वर विकास सेवा सोसायटीचे चेअरमन भारत गरंडे यांनी भोसे जिल्हा परिषद गटामधून जिल्हा परिषदेची निवडणूक लढवावी अशी नंदेश्वरसह भोसे जिल्हा परिषद गटामधील अनेक युवा कार्यकर्त्यांनी मागणी केली आहे. भारत गरंडे हे पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आ. समाधान आवताडे यांचे खंदे समर्थक आहेत.
नंदेश्वरच्या विकासात बहुमोल योगदान…
भारत गरंडे यांचे पुतणे नंदेश्वर गावचे माजी सरपंच अनिल गरंडे यांच्या सरपंच पदाच्या कार्यकाळात भारत गरंडे यांनी पुढाकार घेऊन नंदेश्वर गावच्या विकासासाठी मोलाचे योगदान दिले. आणि या काळातच त्यांच्या नेतृत्वाची क्षमता नंदेश्वर गावकऱ्यांसोबत आसपासच्या गावातील लोकांच्या व तसेच आमदार समाधान आवताडे यांच्यासमोर दिसून आली.
आ.समाधान आवताडे गटाकडून उमेदवारीची मागणी..
भारत गरंडे यांचं नेतृत्व फक्त नंदेश्वर गावापुरतं मर्यादित नसून त्यांना जिल्हा परिषद गटामधून निवडणूक लढवून इतर गावांचा कार्यभार दिला तर ते लिलया पेलतील अशी कार्यकर्त्यांची भावना तयार झाली असल्यामुळेच ते जिल्हा परिषद गटाची निवडणूक लढवावी अशी मागणी करत असल्याचाही चर्चा सध्या होत आहेत. आगामी जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये भोसे जिल्हा परिषद गटामधून आमदार समाधान आवताडे गटाकडून भारत गरंडे यांना उमेदवारी मिळावी अशीही मागणी कार्यकर्ते करताना दिसत आहेत.
धनगर मतांचे प्राबल्य असणारा भोसे जि.प.गट..
भोसे जिल्हा परिषद गट धनगर मतांचा प्राबल्य असणारा गट म्हणून ओळखला जातो. अशा या गटात धनगर समाजाचे युवक नेते भारत गरंडे यांना संधी दिल्यास ते संधीचं सोनं नक्की करतील अशीही भावना कार्यकर्ते सध्या उघडपणे व्यक्त करीत आहेत.
