Homeराजकीयभोसे गावात भाजपला मोठे बळ; शेकडो कार्यकर्त्यांचा प्रदीप खांडेकर आणि आप्पासो निकम...

भोसे गावात भाजपला मोठे बळ; शेकडो कार्यकर्त्यांचा प्रदीप खांडेकर आणि आप्पासो निकम यांना पाठिंबा

भोसे/ प्रतिनिधी : भोसे (ता. मंगळवेढा) येथे भाजपला मोठे बळ मिळाले असून भोसे गावातील दत्ता ताटे यांचेसह शेकडो कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश भाजपसाठी महत्त्वाचा मानला जात आहे. भोसे जिल्हा परिषद गटातील भाजपचे उमेदवार प्रदीप खांडेकर तसेच पंचायत समिती गणाचे उमेदवार आप्पासो निकम यांना जाहीर पाठिंबा देत या कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. या प्रवेशामुळे भोसे गटात भाजपची संघटनात्मक ताकद मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

हा पक्षप्रवेश कार्यक्रम मंगळवेढा नगरपालिकेचे नगरसेवक सोमनाथ आवताडे, तानाजी काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. यावेळी बोलताना आवताडे यांनी भाजपच्या विकासाभिमुख धोरणांवर विश्वास व्यक्त करत, आमदार समाधान आवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली विकासकामांमुळेच सर्वसामान्य कार्यकर्ते भाजपकडे आकर्षित होत आहेत, असे सांगितले.

प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या माध्यमातून भोसे परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी काम करण्याची इच्छा व्यक्त केली. रस्ते, पाणीपुरवठा, शेतीविषयक प्रश्न, युवकांना रोजगार आणि मूलभूत सुविधा या मुद्द्यांवर भाजपच प्रभावीपणे काम करू शकतो, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी उमेदवार प्रदीप खांडेकर व आप्पासो निकम यांनी सर्व नवप्रवेशित कार्यकर्त्यांचे स्वागत करत, भोसे गटाचा सर्वांगीण विकास हेच आमचे ध्येय असून, सर्वांना सोबत घेऊन प्रामाणिकपणे काम करू, असा शब्द दिला. या कार्यक्रमास भाजपचे पदाधिकारी, स्थानिक नेते व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. भोसे गावातील या मोठ्या पक्षप्रवेशामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये भाजपची स्थिती अधिक भक्कम झाल्याचे चित्र दिसत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मंगळवेढ्यात आरोग्यसेवेचा नवा आधारवड बेलदार हॉस्पिटल, अल्पावधीतच ठरले विश्वासार्ह

मंगळवेढा / प्रतिनिधी : मंगळवेढा तालुक्यात आरोग्यसेवेच्या क्षेत्रात अल्पावधीतच ठसा उमटवणारे बेलदार हॉस्पिटल सध्या रुग्णांसाठी आशेचा किरण ठरत आहे. उद्घाटनानंतर अवघ्या दोन महिन्यांच्या कालावधीत...

नंदेश्वर व परिसरातील खाद्यप्रेमींसाठी दोस्ती चायनीज सेंटर सेवेत, उद्घाटन सोहळा दिमाखात संपन्न

नंदेश्वर / प्रतिनिधी : नंदेश्वर (ता. मंगळवेढा) येथील खाद्यप्रेमींसाठी आनंदाची बातमी ठरावी, अशा वातावरणात दोस्ती चायनीज सेंटरचे उद्घाटन उत्साहात व मोठ्या थाटामाटात पार पडले....

माळशिरस येथील प्रभू विश्वकर्मा मंदिराच्या जागेवरून वाद चिघळला; लोहार समाज आक्रमक, राज्यभर आंदोलनांची लाट

माळशिरस / प्रतिनिधी : लोहार समाजाचे आराध्य दैवत असलेल्या प्रभु विश्वकर्मा मंदिरासाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या जागेवरून माळशिरस येथे मोठा वाद निर्माण झाला असून,...

बापूसाहेब आडसूळ यांचा लोहार समाज संघटनेच्या वतीने सत्कार

सोलापूर / प्रतिनिधी : एकनाथ स्वाभिमानी शिक्षककर्मचारी पतसंस्थाच्या चेअरमनपदी बापूसाहेब आडसूळ यांची निवड झाल्याबद्दल लोहार समाजाच्या वतीने त्यांचा सत्कार करून अभिनंदन करण्यात आले. समाजातील...

नंदेश्वर येथे वनपरिक्षेत्रातील वनराईला भीषण आग; अनेक वृक्ष जळून खाक, सुस्त वनविभाग कधी जागा...

नंदेश्वर / प्रतिनिधी : नंदेश्वर येथील वनपरिक्षेत्रातील वनराईला गुरुवार दि. ४ मार्च रोजी पहाटेच्या सुमारास अचानक भीषण आग लागल्याची घटना उघडकीस आली. पहाटेच्या वेळी...

error: Content is protected !!