Homeराजकीयलोकसभेला केले तसे भरघोस मतदान करून काँग्रेस आणि तीर्थक्षेत्र विकास आघाडी युतीच्या...

लोकसभेला केले तसे भरघोस मतदान करून काँग्रेस आणि तीर्थक्षेत्र विकास आघाडी युतीच्या उमेदवारांना निवडून द्या, नंदेश्वर येथील प्रचारसभेत खा. प्रणिती शिंदे यांचे आवाहन

मंगळवेढा/ प्रतिनिधी : दीड वर्षांपूर्वी लोकसभा मतदानाच्या वेळी ज्याप्रकारे तुम्ही मतपेटी द्वारे भाजपच्या विरोधात आपला तीव्र संताप व्यक्त केला होता अगदी त्या प्रकारे तुमच्या जिव्हाळ्याच्या असणाऱ्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीत वनसाईड मतदान करा आणि तीर्थक्षेत्र विकास आघाडी, काँग्रेस युतीच्या बसवराज पाटील, प्रवीण मेटकरी आणि सुरेश कांबळे या तीन उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून द्या. लोकसभेच्यावेळी देखील भाजपने इव्हीएम हॅक केले होते. पण वनसाईड मतदान केल्यानंतर ईव्हीएम हॅक होत नाही. तशाच प्रकारे वनसाईड मतदान करा म्हणजे यावेळी देखील ईव्हीएम हॅक होणार नाही अशी मिस्कील टिप्पणी देखील यावेळी बोलताना खासदार प्रणिती शिंदे यांनी केली.

नंदेश्वर ता. मंगळवेढा येथे भोसे जिल्हा परिषद गटातील तीर्थक्षेत्र विकास आघाडी आणि काँग्रेस युतीच्या उमेदवारांच्या प्रचार सभेत त्या बोलत होत्या. यावेळी विठ्ठल कारखान्याचे माजी चेअरमन भगीरथ भालके, भैरवनाथ शुगरचे चेअरमन अनिल सावंत, दामाजी कारखान्याचे व्हा.चेअरमन तानाजी खरात, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत साळे, प्रदेश सरचिटणीस रविकिरण कोळेकर, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष पांडुरंग चौगुले, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी भागवत गरंडे, युवक नेते अंकुश गरंडे, काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष बजरंग चौगुले, विश्वमाऊली दूध संकलन केंद्राचे चेअरमन दामाजी सलगर दादासाहेब मदने, आबासाहेब पाटील, नामदेव डांगे हे उपस्थित होते.

पालकमंत्री गल्ली-बोळात फिरताना दिसत आहेत – भगीरथ भालके
यावेळी बोलताना भगीरथ भालके म्हणाले की, विधानसभा निवडणुकीच्या वेळी विद्यमान आमदारांनी पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघासाठी तिन हजार कोटीचा निधी आणला असे सांगितले होते. आज साधारणपणे वर्षभरानंतर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत हा आकडा पाच हजार कोटीपर्यंत गेला आहे. एखाद्या मतदारसंघाला पाच हजार कोटी इतका निधी मिळाल्यानंतर तिथे विकास किती व्हायला पाहिजे याचा अभ्यास मतदारांनी करावा. सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रत्येक निवडणुकीत गल्लीबोळात फिरताना दिसत आहेत. इतका निधी आणणाऱ्या आणि विकासाच्या गप्पा मारणाऱ्या भारतीय जनता पक्षाला गल्लीबोळात पालकमंत्र्याला फिरवायची वेळ यावी ही खूप लाजिरवाणी गोष्ट आहे.

सर्वसामान्यांशी जुळलेली नाळ कायम राहील – अनिल सावंत
यावेळी बोलताना अनिल सावंत म्हणाले की, स्व. भारत भालके यांच्या विचाराने प्रेरित झालेले बसवराज पाटील हे आपल्या गटाचा नक्की विकास करतील. भैरवनाथ शुगर च्या माध्यमातून या भागासाठी वेगवेगळ्या प्रकारे मदत केली गेली आहे. यापुढेही अशा प्रकारचे मदत अविरतपणे सुरू राहील. सर्व मतदारांनी तीर्थक्षेत्र विकास आघाडी आणि काँग्रेस युतीच्या उमेदवारांच्या पाठीशी राहून त्यांना भरघोस मतांनी विजयी करावे.

मंगळवेढा तालुक्यातील सर्वात पहिला निधी नंदेश्वरला – प्रशांत साळे
खासदार प्रणिती शिंदे यांनी खासदारकीचा पदभार स्वीकारल्यानंतर मंगळवेढा तालुक्याला दिलेल्या पहिला निधी हा नंदेश्वर गावाला गेला आहे. नंदेश्वर येथील जय भवानी नवरात्र महोत्सव मंडळाच्या अंबाबाई मंदिराच्या सभा मंडपासाठी दहा लाख रुपयांचा निधी खासदार शिंदे यांच्या निधीतून दिला असून त्याचे काम सध्या सुरू आहे. याशिवाय एका रस्त्याला देखील पाच लाख रुपयांचा निधी दिला गेला असल्याचे आठवण काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत साळे यांनी आपल्या प्रस्ताविकात करून दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मंगळवेढा तालुका भाजपा युवा मोर्चाच्या वतीने प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांचा सत्कार

नंदेश्वर / प्रतिनिधी : भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांच्या स्वागतासाठी मंगळवेढा भाजप युवा मोर्चाकडून उत्साहपूर्ण तयारी करण्यात आली. मंगळवेढा नगरपालिकेचे नगरसेवक सोमनाथ...

सलग दुसऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेत यशवंत सासणे याने मिळविले उत्तुंग यश, सर्व स्तरातून अभिनंदन व...

नंदेश्वर / प्रतिनिधी : एन.एम.एम.एस. या शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तुंग असे यश मिळवित शिष्यवृत्तीस पात्र ठरल्यानंतर आता महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद तर्फे घेण्यात आलेल्या उच्च...

52 व्या हिंदकेसरी स्पर्धेत महेंद्र गायकवाडचा दमदार विजय; पृथ्वीराज मोहोळ दुखापतीमुळे माघार

सातारा / विशेष प्रतिनिधी : ऐतिहासिक छत्रपती शाहू स्टेडियम येथे रंगलेल्या 52 व्या हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेच्या अंतिम लढतीत सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील शिरशी गावचा...

आदर्शवत लोकसहभाग ! खुपसंगी-आंधळगाव परिसरातील जळालेल्या झाडांना जीवनदान देण्याचा प्रेरणादायी उपक्रम, श्री कामसिद्ध शेडनेट...

नंदेश्वर / प्रतिनिधी : खुपसंगी-आंधळगाव हद्दीवरील वनिकरण क्षेत्रात अलीकडेच लागलेल्या भीषण आगीत अनेक झाडांचे मोठे नुकसान झाले. अनेक झाडे जळून खाक झाली असून उरलेली...

आदर्शवत लोकसहभाग….खुपसंगी-आंधळगाव परिसरातील जळालेल्या झाडांना जीवनदान देण्याचा प्रेरणादायी उपक्रम, श्री कामसिद्ध शेडनेट शेती शेतकरी...

error: Content is protected !!