Homeराजकीयभोसे जि.प.गटाची निवडणूक सर्वसाधारण आरक्षणामुळे होणार हाय व्होल्टेज? अनेक दिग्गज निवडणूक लढविण्यासाठी...

भोसे जि.प.गटाची निवडणूक सर्वसाधारण आरक्षणामुळे होणार हाय व्होल्टेज? अनेक दिग्गज निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक

सोलापूर आजतक न्यूज नेटवर्क ✍️✍️✍️
मंगळवेढा तालुक्याच्या दक्षिण भागातील भोसे जिल्हा परिषद गटात सर्वसाधारण आरक्षण पडल्यामुळे व तसेच अनेक दिग्गज निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असल्यामुळे भोसे जि.प. गटाची निवडणूक हाय व्होल्टेज होणार असल्याची चर्चा सध्या गटातील गावात मोठ्या प्रमाणावर होत आहे.भोसे जिल्हा परिषद गटामधून भैरवनाथ शुगर उद्योग समूहाचे चेअरमन अनिल सावंत, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत साळे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष दिलीप चव्हाण, दामाजी कारखान्याचे संचालक तानाजी काकडे, माजी उपसभापती दादासाहेब गरंडे, माजी उपसभापती सूर्यकांत ढोणे, माजी जिल्हा परिषद सदस्य नामदेव जानकर, दामाजीचे संचालक गौडाप्पा बिराजदार, माजी पं.स. सदस्य नितीन पाटील, दामाजी कारखान्याचे संचालक बसवराज पाटील, बागडेबाबा दूध संस्थेचे चेअरमन दादासाहेब दोलतडे, नंदेश्वर येथील सोसायटीचे चेअरमन भारत गरंडे, रामचंद्र जाधव, शिरनांदगीचे सरपंच गुलाब थोरबोले, काँग्रेसचे प्रदेश सचिव रविकिरण कोळेकर, बापूसाहेब गरंडे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख अशोक चौंडे, मनसेचे तालुकाध्यक्ष धनाजी गडदे, भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष आकाश डांगे यांचेसह कोंडीराम पतसंस्थेचे चेअरमन बंडू करे हे इच्छुक असल्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर त्यांचे कार्यकर्ते करीत आहेत.

अनिल सावंत यांच्या भूमिकेनंतर ठरणार गटाची दिशा..
भोसे गटातीलच लवंगी गावात भैरवनाथ शुगर हा साखर कारखाना असल्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून अनिल सावंत यांनी गावोगावी कारखान्याच्या माध्यमातून व तसेच आपल्या सामाजिक कार्याच्या माध्यमातून अनेकांना मदत केली आहे त्यांच्या या कार्यामुळे गावोगावी अनेक कार्यकर्ते त्यांचे उघड समर्थन करताना सध्या दिसत आहेत. आणि त्यांची नुकतीच भैरवनाथ शुगर उद्योग समूहाच्या चेअरमनपदी निवड झाली असल्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी त्यांना मोठी ताकद मिळाली आहे. शिवाय राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात ते सध्या कार्यरत असल्यामुळे पक्षाची ताकद त्यांना बऱ्यापैकी मिळाली आहे. अनिल सावंत यांनी या गटामधून निवडणूक लढविण्याचा विचार केल्यास गटाची निवडणूक अत्यंत चुरशीची आणि हाय व्होल्टेज होणार असल्याची चर्चा सध्या होत आहे.

आ.समाधान आवताडे गट बलशाली..
मंगळवेढा तालुक्याच्या राजकारणाची दिशा ठरविणारा जिल्हा परिषद गट असे भोसे गटाची ओळख आजपर्यंत राहिली आहे. कारण मंगळवेढा तालुक्याचे राजकारण ज्या पाणी प्रश्नाभोवती आजपर्यंत फिरले आहे. ती सर्व गावे या जिल्हा परिषद गटात येतात. कै.मा.आ. भारत भालके यांना मानणारा जिल्हा परिषद गट अशी ओळख असणाऱ्या या गटाची ओळख भालके यांच्या निधनानंतर बदलून गेली आहे. भालके गटाच्या अनेक कार्यकर्त्यांनी आ.आवताडे यांच्या गटात प्रवेश केला आहे. तसेच मंगळवेढा उपसा सिंचन योजना पूर्णत्वास नेण्यासाठी आमदार समाधान आवताडे यांनी केलेले प्रयत्न यामुळे गत विधानसभा निवडणुकीनंतर आ.आवताडे गट बलशाली झाल्याचे दिसत आहे.

काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत साळे देतील चांगली लढत..
काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत साळे यांनी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पद स्वीकारण्यापासून मोठी ग्रीप घेतली आहे. अनेक लोकांना खासदार प्रणिती शिंदे यांच्या माध्यमातून मदत मिळवून दिली आहे. तसेच दक्षिण भागातील अनेक प्रश्नांवर त्यांनी आवाज उठविला आहे. सर्वसाधारण आरक्षणात मध्ये त्यांनी निवडणूक लढविण्याचा विचार केल्यास ते चांगली लढत देऊ शकतात असेही त्यांचे कार्यकर्ते सांगत आहे.

आ.समाधान आवताडे गटाकडून तानाजी काकडे यांचे नाव आघाडीवर..
आ.समाधान आवताडे गटाकडून तानाजी काकडे यांचे नाव सध्या आघाडीवर दिसत आहे. तालुक्याच्या राजकारणातील एक मोठं नाव असलेले तानाजी काकडे हे त्यांच्या स्वतःच्या कार्यावर असेच आमदार अवताडे यांच्या पाठबळावर चांगली लढत देतील.

धनगर मतांचे प्राबल्य.. दादासाहेब गरंडे, नामदेव जानकर, दादासाहेब दोलतडे, भारत गरंडे दिग्गज नावे… रड्डे पं.स. गणनातून आ.आवताडे गटाकडून आकाश डांगे आघाडीवर..
भोसे गटात धनगर, मराठा, लिंगायत या तिन्ही जातींचे प्राबल्य असले तरी मराठा आणि लिंगायत या मतांच्या तुलनेत धनगर मतांचा टक्का मोठा आहे. त्यामुळे धनगर समाजाचे प्राबल्य असणारा जिल्हा परिषद गट अशी या गटाची ओळख आहे. त्यामुळे या गटाचे नंदेश्वर येथील माजी महिला व बालकल्याण सभापती रतनताई मेटकरी, नामदेव जानकर, माजी उपसभापती दादासाहेब गरंडे यांच्या स्नुषा अंकिता गरंडे यांनी याआधी प्रतिनिधीत्व केले आहे. शिवाय गत जिल्हा परिषद निवडणुकीत सर्वसाधारण आरक्षणातूनच नामदेव जानकर हे अल्पमतात पराभूत झाले होते. त्यामुळे भोसे जिल्हा परिषद गटावर सलग वीस वर्षे अधिराज्य गाजवलेले दादासाहेब गरंडे, नामदेव जानकर, दादासाहेब दोलतडे, भारत गरंडे ही नावे दिग्गज आहेत. यांचेसह गुलाब थोरबोले, रविकरण कोळेकर या नावांचाही विचार त्यांचे गॉडफादर करतील.भोसे जिल्हा परिषद गटातील रड्डे पंचायत समिती गण अनुसूचित जाती जमातीसाठी आरक्षित झाल्यामुळे या गणातून भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष आकाश डांगे यांचे नाव आमदार समाधान आवताडे गटाकडून आघाडीवर आहे. एकुणात सर्वसाधारण आरक्षणामुळे भोसे जिल्हा परिषद गटाची निवडणूक हाय व्होल्टेज होणार आहे हे मात्र नक्की..

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

न्यूज नंदेश्वर (ता. मंगळवेढा) येथील जिल्हा परिषद केंद्र शाळेला गोणेवाडी (ता. मंगळवेढा) येथील सामाजिक कार्यकर्ते अजित हजारे यांनी अत्यंत उत्कृष्ट दर्जाचा प्रिंटर भेट दिला....

नंदेश्वर येथील जिल्हा परिषद केंद्र शाळेला अजित हजारे यांच्याकडून प्रिंटर भेट, अजित हजारे यांच्या...

सोलापूर आजतक न्यूज नेटवर्क.. नंदेश्वर (ता. मंगळवेढा) येथील जिल्हा परिषद केंद्र शाळेला गोणेवाडी (ता. मंगळवेढा) येथील अजित हजारे यांनी अत्यंत उत्कृष्ट दर्जाचा प्रिंटर भेट दिला....

भोसे जिल्हा परिषद गटाला अनिल सावंत यांच्या नेतृत्वाची गरज – सुशिक्षित मतदार दादासाहेब मळगे...

सोलापूर आजतक न्यूज नेटवर्क... आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भोसे जिल्हा परिषद गटाला भैरवनाथ शुगर उद्योग समूहाचे चेअरमन अनिल सावंत यांच्या नेतृत्वाची गरज असल्याचे प्रतिपादन...

जीवन हॉस्पिटलचा सोळावा वर्धापन दिन – रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा तत्त्वाचा अंगीकार करून डॉ.विवेकानंद...

जत विशेष प्रतिनिधी... जत तालुक्यातील आरोग्यसेवेच्या क्षेत्रात आदर्श निर्माण करणारे जीवन हॉस्पिटल, जत यांनी आपला सोळावा वर्धापन दिन साजरा करताना सलग सोळा वर्षे अविरतपणे रुग्णसेवा...

भाजपच्या जिल्हा चिटणीसपदी सुनील थोरबोले यांची निवड, याराना परिवारात जल्लोष

सोलापूर आजतक न्यूज नेटवर्क... भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा चिटणीसपदी मंगळवेढा तालुक्यातील दक्षिण भागातील रड्डे गावचे सुपुत्र याराना परिवाराचे प्रमुख सुनील थोरबोले यांची निवड...

error: Content is protected !!