Homeराजकीयअनिल सावंत यांचा पुढाकार, नाराज नगरसेवक आणि भगीरथ भालके यांच्यात समेट घडवून...

अनिल सावंत यांचा पुढाकार, नाराज नगरसेवक आणि भगीरथ भालके यांच्यात समेट घडवून आणण्यासाठी अनिल सावंत यांचा पुढाकार, अनिल सावंत यांचे सोबत नाराज नगरसेवक आ. तानाजी सावंत यांच्या भेटीला

पंढरपूर / प्रतिनिधी : पंढरपूर नगरपरिषदेतील राजकारणाला नवे वळण लागण्याची चिन्हे स्पष्ट दिसू लागली आहेत. विठ्ठल परिवाराचे नेते भगीरथ भालके यांच्यावर नाराज असलेल्या नगरसेवकांच्या गटाने थेट शिंदेसेनेचे आमदार तानाजी सावंत यांची भेट घेतल्याने शहरातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. विशेष म्हणजे ही भेट भालके यांना पूर्णपणे वगळून पार पडली, यामुळे अंतर्गत मतभेद अधिकच उघड झाले आहेत.

भालके यांनी शिंदेसेनेत प्रवेश करण्याबाबत स्थानिक कार्यकर्त्यांची मते जाणून घेण्यासाठी बैठक आयोजित केली होती. मात्र, तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या नगरसेवकांनी या बैठकीकडे पाठ फिरवली. गटनेते नागेश भोसले यांनीही “आमचा गट स्वतंत्र आहे” असे स्पष्ट करत भालके यांना उघड आव्हान दिले होते.

दरम्यान, तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे अध्यक्ष सुधीर धुमाळ, नगरसेवक संजय बंदपट्टे, प्रसाद कळसे, अक्षय गंगेकर, किरण घाडगे, सुधीर धोत्रे आणि धनंजय धोत्रे यांनी आमदार तानाजी सावंत यांची भेट घेतली. ही भेट भैरवनाथ शुगर उद्योग समूहाचे अध्यक्ष अनिल सावंत यांच्या पुढाकाराने घडवून आणण्यात आली. नागेश भोसले आजारी असल्याने या भेटीस उपस्थित राहू शकले नाहीत.

या बैठकीत नगरसेवकांनी स्पष्ट भूमिका मांडली की, “आम्ही भालके यांच्यासोबत शिंदेसेनेत जाणार नाही. मात्र, आम्ही स्वतंत्रपणे तुमच्यासोबत येण्यास तयार आहोत. आमच्या प्रभागाच्या विकासासाठी स्वतंत्र निधी मिळावा,” अशी मागणी त्यांनी आमदार सावंत यांच्याकडे केली. यावर निधीबाबत कोणतीही अडचण येणार नसल्याचे आश्वासन सावंत यांनी दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

सध्या नगरपरिषदेत नगराध्यक्षपदी प्रणिता भालके विराजमान असल्या, तरी भाजप आणि परिचारक गटाचे अधिक नगरसेवक निवडून आल्यामुळे सत्तेचा समतोल भालके यांच्या विरोधात आहे. परिणामी, नगरपरिषदेतील कामकाज सुरळीत पार पाडताना त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर, राज्यातील सत्ताधारी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करून निधी आणि राजकीय पाठबळ मिळवण्याचा भालके यांचा प्रयत्न सुरू आहे. या प्रयत्नांमध्ये त्यांचे काका आणि भैरवनाथ शुगर उद्योग समूहाचे अध्यक्ष अनिल सावंत सक्रिय भूमिका बजावत आहेत. आमदार तानाजी सावंत यांच्या माध्यमातून हा प्रवेश सुलभ करण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे.

त्याचवेळी, तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे नगरसेवक भालके यांच्यापासून पूर्णपणे दुरावू नयेत आणि स्थानिक पातळीवर एकजूट टिकून राहावी, यासाठीही अनिल सावंत यांनी मध्यस्थीची भूमिका घेतल्याचे दिसून येते. गुरुवारी झालेली ही भेट त्याचाच भाग असल्याचे राजकीय वर्तुळात चर्चिले जात आहे. एकूणच, पंढरपूर नगरपरिषदेतील सत्तासमीकरणे झपाट्याने बदलत असून, आगामी काळात शहराच्या राजकारणात आणखी नाट्यमय घडामोडी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

ब्रेकिंग न्यूज… रक्षाबंधनासाठी मित्राच्या बहिणीला आणायला निघाला; परतीच्या वाटेवर काळाने हिरावला मित्राचा जीव; गोणेवाडीवर...

मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी रक्षाबंधनाच्या सणासाठी बहिणीला माहेरी आणण्याचा आनंद घेऊन निघालेल्या भावाच्या वाट्याला नियतीने मात्र काळीज पिळवटून टाकणारे दुःख दिले. मित्राच्या बहिणीला घरी...

श्रीक्षेत्र नंदेश्वर येथे श्री. स.स. बाळकृष्ण महाराज यांचा शतकोत्तर रौप्य महोत्सवी जन्मोत्सव, देवसागर साधक...

नंदेश्वर / प्रतिनिधी : ब्रह्मांडनायक रा.रा. श्री. स.स. बाळकृष्ण महाराज (नंदेश्वर) आणि श्री. स.स. भाऊसाहेब महाराज (नंदेश्वर) यांच्या कृपाशीर्वादाने श्रीक्षेत्र नंदेश्वर येथे श्री. स.स....

सचिन निकम यांना ज्ञानयात्री आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर, सर्व स्थरातून अभिनंदन

मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी माध्यमिक आश्रमशाळा हुन्नुरचे सहशिक्षक सचिन निकम यांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि विद्यार्थीकेंद्री कार्याची दखल घेत त्यांची ‘ज्ञानयात्री आदर्श शिक्षक पुरस्कार’ यासाठी निवड...

श्री बाळकृष्ण विद्यालय व ज्युनिअर कॉलेजचे सहशिक्षक प्रवीण डांगे यांना ‘ज्ञानयात्री आदर्श शिक्षक पुरस्कार’...

मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी श्री बाळकृष्ण विद्यालय व ज्युनिअर कॉलेजचे सहशिक्षक प्रवीण डांगे यांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि विद्यार्थीकेंद्री कार्याची दखल घेत त्यांची ‘ज्ञानयात्री आदर्श शिक्षक...

दखल कार्याची… डॉ. भारत गरंडे यांना ‘शिव मल्हार वैद्यकीय समाजभूषण जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान, सर्व...

मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी गेल्या वीस वर्षांपासून सातत्याने वैद्यकीय सेवा देत समाजातील गरजू रुग्णांना आरोग्यसेवेचा आधार देणारे नंदेश्वरचे सुपुत्र डॉ.भारत गरंडे यांना त्यांच्या उल्लेखनीय वैद्यकीय...

error: Content is protected !!