Homeताज्या बातम्यालोहार समाजाच्या विकासासाठी ऐतिहासिक पाऊल; मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेसह मंत्रीमंडळाचा लोहार...

लोहार समाजाच्या विकासासाठी ऐतिहासिक पाऊल; मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेसह मंत्रीमंडळाचा लोहार समाजाच्या वतीने भव्य सत्कार आणि ३२ मागण्यांचे निवेदन

मुंबई / विशेष प्रतिनिधी : महाराष्ट्र शासनाच्या पुढाकारातून लोहार समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी स्थापन करण्यात आलेल्या “ब्रह्मलीन आचार्य दिव्यानंदपुरीजी महाराज आर्थिक विकास महामंडळ” या लोहार समाजाच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या आर्थिक महामंडळाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील लोहार समाजात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. या निर्णयाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तसेच समाजाच्या विविध प्रश्नांना अधोरेखित करण्यासाठी एक भव्य सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे. लोहार समाज राज्यस्तरीय समन्वय समिती आणि महाराष्ट्रातील विविध लोहार समाज संघटनांच्या संयुक्त विद्यमाने हा सोहळा शनिवार, दि. २५ एप्रिल २०२६ रोजी दुपारी ३ वाजता दादर (पूर्व), मुंबई येथील वसंतस्मृती, भारतीय जनता पार्टी कार्यालय येथे पार पडणार आहे.

मुख्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळातील अनेक मंत्री राहणार उपस्थित
या कार्यक्रमात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून, त्यांच्यासह राज्यातील अनेक मान्यवर मंत्री व पक्षाचे नेते उपस्थित राहून लोहार समाजाशी संवाद साधणार आहेत. प्रमुख अतिथींमध्ये चंद्रशेखर बावनकुळे (महसूल मंत्री), आशिष शेलार (सांस्कृतिक कला मंत्री), मंगल प्रभात लोढा (कौशल्य विकास मंत्री) यांचा समावेश आहे. तसेच राजेंद्र चव्हाण, अमित साटम आणि निहारिका खोंडले यांसारखे मान्यवरही उपस्थित राहणार आहेत.

शासन आणि समाज यांच्यातील संवाद अधिक दृढ करण्यासाठी कार्यक्रम
या सोहळ्याचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे लोहार समाजाच्या विविध समस्या आणि विकासाच्या दृष्टीने तयार करण्यात आलेल्या ३२ महत्त्वपूर्ण मागण्यांचे निवेदन मंत्रीमंडळास सादर करण्यात येणार आहे. शिक्षण, रोजगार, उद्योगधंदे, आर्थिक सक्षमीकरण आणि सामाजिक न्याय या क्षेत्रांतील प्रश्नांचा या मागण्यांमध्ये समावेश असल्याचे समजते. समाजाच्या प्रगतीसाठी स्थापन करण्यात आलेल्या आर्थिक विकास महामंडळामुळे लोहार समाजातील युवकांना स्वावलंबनाच्या नव्या संधी उपलब्ध होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. त्याचबरोबर शासन आणि समाज यांच्यातील संवाद अधिक दृढ करण्यासाठी हा कार्यक्रम एक महत्त्वाचा दुवा ठरणार आहे.

राज्यभरातून लोहार समाज मोठ्या संख्येने राहणार उपस्थित
या भव्य सोहळ्याला राज्यभरातून लोहार समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहतील, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे. समाजाच्या एकजुटीचे आणि संघटित शक्तीचे दर्शन घडवणारा हा कार्यक्रम भविष्यातील विकासाचा मार्ग निश्चित करणारा ठरेल, असे मतही व्यक्त करण्यात येत आहे. समाजातील सर्व बंधू-भगिनींनी सहपरिवार उपस्थित राहून या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार व्हावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

ब्रेकिंग न्यूज… रक्षाबंधनासाठी मित्राच्या बहिणीला आणायला निघाला; परतीच्या वाटेवर काळाने हिरावला मित्राचा जीव; गोणेवाडीवर...

मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी रक्षाबंधनाच्या सणासाठी बहिणीला माहेरी आणण्याचा आनंद घेऊन निघालेल्या भावाच्या वाट्याला नियतीने मात्र काळीज पिळवटून टाकणारे दुःख दिले. मित्राच्या बहिणीला घरी...

श्रीक्षेत्र नंदेश्वर येथे श्री. स.स. बाळकृष्ण महाराज यांचा शतकोत्तर रौप्य महोत्सवी जन्मोत्सव, देवसागर साधक...

नंदेश्वर / प्रतिनिधी : ब्रह्मांडनायक रा.रा. श्री. स.स. बाळकृष्ण महाराज (नंदेश्वर) आणि श्री. स.स. भाऊसाहेब महाराज (नंदेश्वर) यांच्या कृपाशीर्वादाने श्रीक्षेत्र नंदेश्वर येथे श्री. स.स....

सचिन निकम यांना ज्ञानयात्री आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर, सर्व स्थरातून अभिनंदन

मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी माध्यमिक आश्रमशाळा हुन्नुरचे सहशिक्षक सचिन निकम यांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि विद्यार्थीकेंद्री कार्याची दखल घेत त्यांची ‘ज्ञानयात्री आदर्श शिक्षक पुरस्कार’ यासाठी निवड...

श्री बाळकृष्ण विद्यालय व ज्युनिअर कॉलेजचे सहशिक्षक प्रवीण डांगे यांना ‘ज्ञानयात्री आदर्श शिक्षक पुरस्कार’...

मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी श्री बाळकृष्ण विद्यालय व ज्युनिअर कॉलेजचे सहशिक्षक प्रवीण डांगे यांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि विद्यार्थीकेंद्री कार्याची दखल घेत त्यांची ‘ज्ञानयात्री आदर्श शिक्षक...

दखल कार्याची… डॉ. भारत गरंडे यांना ‘शिव मल्हार वैद्यकीय समाजभूषण जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान, सर्व...

मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी गेल्या वीस वर्षांपासून सातत्याने वैद्यकीय सेवा देत समाजातील गरजू रुग्णांना आरोग्यसेवेचा आधार देणारे नंदेश्वरचे सुपुत्र डॉ.भारत गरंडे यांना त्यांच्या उल्लेखनीय वैद्यकीय...

error: Content is protected !!