Homeराजकीयभोसे जिल्हा परिषद गटात भाजपचे पारडे जड; बबनराव अवताडेंच्या पाठिंब्याने राजकीय समीकरणे...

भोसे जिल्हा परिषद गटात भाजपचे पारडे जड; बबनराव अवताडेंच्या पाठिंब्याने राजकीय समीकरणे बदलली

भोसे / विशेष प्रतिनिधी : भोसे जिल्हा परिषद गटात भारतीय जनता पक्षाची ताकद दिवसेंदिवस वाढत चालली असून, मंगळवेढा तालुक्याचे प्रभावी नेते बबनराव अवताडे यांनी भाजपच्या उमेदवारांना जाहीर पाठिंबा दिल्यामुळे या गटातील राजकीय समीकरणे पूर्णतः बदलली आहेत. जिल्हा परिषद उमेदवार प्रदीप खांडेकर,भोसे पंचायत समिती गणातील उमेदवार आप्पासो निकम तसेच रड्डे पंचायत समिती गणातील उमेदवार दत्तात्रय कांबळे यांना बबनराव आवताडे गटाचा पाठिंबा मिळाल्याने भाजपचे पारडे स्पष्टपणे जड झाले आहे.

बबनराव अवताडे हे मंगळवेढा तालुक्यातील एक वजनदार नेतृत्व मानले जाते. त्यांच्या निर्णयाचा मोठा प्रभाव स्थानिक राजकारणावर पडतो. त्यांनी भाजपच्या उमेदवारांना दिलेल्या पाठिंब्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, गावोगावी भाजपच्या प्रचाराला अधिक गती मिळत आहे.भोसे जिल्हा परिषद गटात भाजपच्या उमेदवारांना विविध स्तरांतून वाढता प्रतिसाद मिळत असून, सामान्य मतदारांपासून ते स्थानिक कार्यकर्त्यांपर्यंत सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. विकासकामांचा ठोस अजेंडा, संघटनात्मक ताकद आणि अनुभवी नेतृत्व यामुळे भाजपच्या उमेदवारांकडे मतदारांचा कल वाढत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.

या गटात भाजपच्या उमेदवारांना मिळणारा पाठिंबा दिवसेंदिवस वाढत चालल्याने भाजपचा विजय जवळपास निश्चित असल्याची चर्चा मतदारांमध्ये रंगू लागली आहे. विरोधी गटांची धावपळ वाढली असली, तरी सध्याची राजकीय परिस्थिती पाहता भोसे जिल्हा परिषद गटात भाजपला मोठे यश मिळण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. आगामी काळात प्रचाराची तीव्रता आणखी वाढणार असून, बबनराव अवताडेंच्या सक्रिय सहभागामुळे भाजपची आघाडी अधिक मजबूत होत जाणार, अशी अपेक्षा राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मंगळवेढ्यात आरोग्यसेवेचा नवा आधारवड बेलदार हॉस्पिटल, अल्पावधीतच ठरले विश्वासार्ह

मंगळवेढा / प्रतिनिधी : मंगळवेढा तालुक्यात आरोग्यसेवेच्या क्षेत्रात अल्पावधीतच ठसा उमटवणारे बेलदार हॉस्पिटल सध्या रुग्णांसाठी आशेचा किरण ठरत आहे. उद्घाटनानंतर अवघ्या दोन महिन्यांच्या कालावधीत...

नंदेश्वर व परिसरातील खाद्यप्रेमींसाठी दोस्ती चायनीज सेंटर सेवेत, उद्घाटन सोहळा दिमाखात संपन्न

नंदेश्वर / प्रतिनिधी : नंदेश्वर (ता. मंगळवेढा) येथील खाद्यप्रेमींसाठी आनंदाची बातमी ठरावी, अशा वातावरणात दोस्ती चायनीज सेंटरचे उद्घाटन उत्साहात व मोठ्या थाटामाटात पार पडले....

माळशिरस येथील प्रभू विश्वकर्मा मंदिराच्या जागेवरून वाद चिघळला; लोहार समाज आक्रमक, राज्यभर आंदोलनांची लाट

माळशिरस / प्रतिनिधी : लोहार समाजाचे आराध्य दैवत असलेल्या प्रभु विश्वकर्मा मंदिरासाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या जागेवरून माळशिरस येथे मोठा वाद निर्माण झाला असून,...

बापूसाहेब आडसूळ यांचा लोहार समाज संघटनेच्या वतीने सत्कार

सोलापूर / प्रतिनिधी : एकनाथ स्वाभिमानी शिक्षककर्मचारी पतसंस्थाच्या चेअरमनपदी बापूसाहेब आडसूळ यांची निवड झाल्याबद्दल लोहार समाजाच्या वतीने त्यांचा सत्कार करून अभिनंदन करण्यात आले. समाजातील...

नंदेश्वर येथे वनपरिक्षेत्रातील वनराईला भीषण आग; अनेक वृक्ष जळून खाक, सुस्त वनविभाग कधी जागा...

नंदेश्वर / प्रतिनिधी : नंदेश्वर येथील वनपरिक्षेत्रातील वनराईला गुरुवार दि. ४ मार्च रोजी पहाटेच्या सुमारास अचानक भीषण आग लागल्याची घटना उघडकीस आली. पहाटेच्या वेळी...

error: Content is protected !!