सोलापूर आजतक न्यूज नेटवर्क
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, नंदेश्वर येथील उपशिक्षक दादासाहेब इंगोले यांना श्री. स्वामी समर्थ शासकीय व जिल्हा परिषद शिक्षक व सेवक सहकारी पतसंस्था, सोलापूर तर्फे देण्यात येणारा जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार आज एका भव्य सोहळ्यात प्रदान करण्यात आला. हा कार्यक्रम सिनाई ॲग्रो टुरिझम, कामती येथे अत्यंत उत्साहात पार पडला.
मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार प्रदान
कार्यक्रमास पतसंस्थेचे चेअरमन अंकुश कुंभार तसेच संचालक मंडळातील मान्यवर उपस्थित होते. जिल्हा शिक्षक संघाचे अध्यक्ष अनिरुद्ध पवार, कार्यकारी अध्यक्ष रणजित थिटे, न.पा. शिक्षक संघाचे राज्य सरचिटणीस संजय चेळेकर, आदर्श शिक्षक समितीचे अध्यक्ष चाफाकरंडे, जुनी पेन्शन संघटनेचे अध्यक्ष राम शिंदे आदी मान्यवरांच्या उपस्थितीने सोहळ्याची शोभा वाढली.
तसेच मंगळवेढा तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शिक्षकवृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय आणि प्रेरणादायी कार्याची दखल म्हणून दादासाहेब इंगोले हा सन्मान प्राप्त झाला.
सहकारी शिक्षक वृंद व प्रशालेच्या वतीने सत्कार
आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेच्या वतीने त्यांचा सत्कार करून शुभेछा देण्यात आल्या. याप्रसंगी उपस्थित शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष दामाजी सलगर, सदस्य समाधान मोटे, नंदेश्वर केंद्राचे केंद्रप्रमुख प्रदीप पाटील यांचे सह प्रशालेतील शिक्षक वृंद उपस्थित होते. याप्रसंगी दादासाहेब इंगोले गुरुजी यांच्यातर्फे सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले.























