Homeराजकीयभोसे गटात कोण बाजी मारणार ? दोन्ही गटाकडून विजयाची दावे, जातीय समीकरणे...

भोसे गटात कोण बाजी मारणार ? दोन्ही गटाकडून विजयाची दावे, जातीय समीकरणे ठरणार निर्णायक, उत्सुकता शिगेला

नंदेश्वर / प्रतिनिधी : मंगळवेढा तालुक्यातील सर्वाधिक लक्षवेधक ठरलेल्या भोसे जिल्हा परिषद गटाच्या निवडणुकीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे. या गटात यंदा तिरंगी लढत पाहायला मिळाली. भाजपकडून प्रदीप खांडेकर, तीर्थक्षेत्र विकास आघाडी कडून बसवराज पाटील, तर वंचित बहुजन आघाडी कडून ॲड. बापूसाहेब मेटकरी यांनी निवडणूक रिंगणात उडी घेतली. मात्र प्रत्यक्ष प्रचार आणि मतदानाच्या प्रक्रियेत भाजपचे उमेदवार प्रदीप खांडेकर आणि तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे उमेदवार बसवराज पाटील यांच्यातच मुख्य लढत रंगली असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

सात तारखेला प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर संपूर्ण भोसे गटात निकालाबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. मतदानानंतर लगेचच गावागावात, चौकाचौकात, टपऱ्यांवर, चहाच्या हॉटेलांवर अंदाज, दावे-प्रतिदावे सुरू झाले. या गावातून अमुक उमेदवाराला इतके मताधिक्य मिळेल, त्या गावात अमुक उमेदवार पिछाडीवर पडेल अशा प्रकारचे चर्चांचे फड रंगताना दिसत आहेत.

भोसे जिल्हा परिषद गटातील एकूण १६ गावांमध्ये मतदान झाले असून, बहुतांश गावांमध्ये लढत अत्यंत अटीतटीची झाल्याचे चित्र आहे. कोणत्याही एका उमेदवाराने स्पष्ट आघाडी घेतल्याचे संकेत अद्याप मिळत नसल्याने निकाल शेवटच्या फेरीपर्यंत गेला तर आश्चर्य वाटणार नाही, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. या निवडणुकीत जातीय समीकरणे महत्त्वाची ठरल्याची चर्चा जोर धरत आहे. विशेषतः मराठा समाजाची मते कोणाच्या पारड्यात अधिक प्रमाणात पडली आहेत, यावरच विजयाचे गणित अवलंबून असल्याचे बोलले जात आहे. लढत अधिक चुरशीची बनली असल्याचे मत राजकीय अभ्यासक व्यक्त करत आहेत.

दरम्यान वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार बापूसाहेब मेटकरी यांना नेमकी किती मते मिळणार, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. थेट विजयाच्या शर्यतीत नसले तरी त्यांना मिळणारी मते निकालावर निर्णायक प्रभाव टाकू शकतात, अशी चर्चा आहे. दोन्ही प्रमुख उमेदवारांकडून विजयाचे दावे केले जात असल्यामुळे भोसे गटातील वातावरण अधिकच तापले आहे. निकाल जाहीर होईपर्यंत ही उत्सुकता कायम राहणार असून, भोसे जिल्हा परिषद गटाचा कौल कोणाच्या बाजूने लागतो याकडे संपूर्ण मंगळवेढा तालुक्याचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अनिल सावंत स्वगृही शिवसेनेत परतणार ?? कार्यकर्ते म्हणताहेत जिथे सन्मान नाही तिथे राहूच नका.

मंगळवेढा / प्रतिनिधी : पंढरपूर–मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील राजकारणात सध्या भैरवनाथ शुगर उद्योग समूहाचे चेअरमन तथा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अनिल सावंत यांच्या भूमिकेबाबत...

बेलदार हॉस्पिटलमध्ये सर्पदंश झालेल्या रुग्णाला नवजीवन; डॉ. सचिन बेलदार आणि डॉ. अपेक्षा बेलदार यांचा...

मंगळवेढा / प्रतिनिधी : चार दिवसांपूर्वी सर्पदंशामुळे अत्यंत गंभीर अवस्थेत दाखल झालेल्या साठ वर्षीय रुग्णाला बेलदार हॉस्पिटलमधील डॉ. सचिन बेलदार आणि डॉ.अपेक्षा बेलदार यांच्या...

मंगळवेढ्याचे अस्थिरोगतज्ञ डॉ. नितीन चौंडे आरोग्यरत्न पुरस्काराने सन्मानित, सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव

नंदेश्वर / प्रतिनिधी : मंगळवेढा तालुक्यातील ख्यातनाम अस्थिरोग तज्ञ डॉ. नितीन चौंडे यांना साप्ताहिक रणयुग टाइम्सच्या वतीने प्रदान करण्यात येणाऱ्या “आरोग्यरत्न” या मानाच्या पुरस्काराने...

रणयुग टाईम्सने सत्यनिष्ठ, निर्भीड व संघर्षमय पत्रकारिता करत समाजात आपली वेगळी ओळख निर्माण केली ...

मंगळवेढा | प्रतिनिधी : साप्ताहिक रणयुग टाईम्स च्या १४ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात आमदार समाधान आवताडे यांनी मार्गदर्शन करत पत्रकारितेच्या भूमिकेवर सखोल भाष्य...

नंदेश्वर येथे अवकाळी पावसाचा मोठा फटका; बेदाणे शेडचे नुकसान, वीज पडून गाय दगावली, आ.समाधान...

नंदेश्वर / प्रतिनिधी : मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर परिसरात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकरी व नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अचानक झालेल्या पावसाने द्राक्ष उत्पादनासाठी...

error: Content is protected !!