Homeराजकीयएका दगडात दोन पक्षी, आ.समाधान आवताडेंचा राजकीय डाव; एका प्रवेशात दोन जिल्हा...

एका दगडात दोन पक्षी, आ.समाधान आवताडेंचा राजकीय डाव; एका प्रवेशात दोन जिल्हा परिषद गटांचा मार्गी??

मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी : मंगळवेढा तालुक्यातील जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने आखलेला राजकीय डाव सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. आमदार समाधान आवताडे यांनी हुलजंती आणि भोसे या दोन महत्त्वाच्या जिल्हा परिषद गटांमधील संभाव्य अडचणी एका निर्णयातून सोडविल्याने “एका दगडात दोन पक्षी” अशी चर्चा तालुकाभर रंगू लागली आहे. हुलजंती जिल्हा परिषद गटातून भाजप विरोधी आघाडीच्या वतीने इच्छुक असलेले, तसेच सर्व क्षेत्रात जोरदार तयारी केलेले हणमंत दुधाळ यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला. या प्रवेशामुळे राजकीय समीकरणे झपाट्याने बदलली.

प्रदीप खांडेकर आणि हणमंत दुधाळ यांच्यात होणारी थेट लढत टळली
हुलजंती गट हा सर्वसाधारण स्त्री आरक्षणासाठी राखीव असल्याने आता हणमंत दुधाळ यांच्या पत्नीला भाजपकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता जवळजवळ निश्चित मानली जात आहे. या घडामोडीमुळे हुलजंती जिल्हा परिषद गटातून माजी सभापती प्रदीप खांडेकर आणि हणमंत दुधाळ यांच्यात होणारी थेट लढत टळली आहे.

प्रदीप खांडेकर भोसे जिल्हा परिषद गटातन निश्चित
दुसरीकडे, सर्वसाधारण आरक्षण असलेल्या भोसे जिल्हा परिषद गटामधून भाजपच्या वतीने सक्षम, सर्व बाजूंनी ताकद असलेला उमेदवार देण्याची गरज होती. मात्र सद्यस्थितीत भोसे गटात आवताडे गटाकडे किंवा भाजपकडे तसा सक्षम पर्याय उपलब्ध नसल्याची चर्चा होती. अशा परिस्थितीत माजी सभापती प्रदीप खांडेकर यांना भोसे जिल्हा परिषद गटातून उमेदवारी देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची चर्चा आहे.

हुलजंती आणि भोसे जिल्हा परिषद गटाचा प्रश्न मार्गी
या एका निर्णयामुळे हुलजंती आणि भोसे या दोन्ही जिल्हा परिषद गटांमधील उमेदवारीचा प्रश्न मार्गी लागला. हणमंत दुधाळ यांच्या भाजप प्रवेशामुळे हुलजंती गटातील गणित सुटले, तर प्रदीप खांडेकर यांना भोसे गटातून संधी देणार असल्याची माहिती मिळत असल्यामुळे पक्षाला अनुभवी व सक्षम उमेदवार मिळाला. परिणामी, आमदार समाधान आवताडे यांनी एका प्रवेशातून दोन गटांचे राजकीय समीकरण जुळवून आणले, अशी भावना भाजप कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपची रणनीती अधिक मजबूत झाली असून, मंगळवेढा तालुक्यातील राजकारणाला नव्या घडामोडींनी वेग आला आहे. पुढील काळात या निर्णयाचा निवडणूक निकालावर नेमका कसा परिणाम होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सलाम पत्रकारितेला…एपस्टीन फाइल् प्रकरण उघड करणाऱ्या ज्युली के. ब्राऊन यांची धाडसी पत्रकारिता

अमेरिकेतील अब्जाधीश वित्तीय दलाल जेफ्री एपस्टीन याच्याविरोधातील लैंगिक शोषण प्रकरणाला नव्याने उजाळा देण्याचे श्रेय तपास पत्रकार ज्युली के. ब्राऊन यांना दिले जाते. सत्ताधाऱ्यांच्या छत्रछायेखाली...

लोहार समाजाचा पंढरपूर उपविभागीय पोलीस कार्यालयावर आक्रोश मोर्चा, डी‌.वाय‌‌.एस.पी. प्रशांत ढगळे यांचे चौकशी करून...

पंढरपूर / तालुका प्रतिनिधी : पंढरपूर तालुक्यातील उंबरगाव येथे घडलेल्या एका संशयित मृत्यू प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली असून संबंधित आरोपीस तात्काळ अटक करावी, या...

झुंज एकाकी..बसवराज पाटील यांनी दिलेली एकाकी झुंज भोसे गटासह मंगळवेढा तालुक्याच्या राजकारणात कायम स्मरणात...

नंदेश्वर / बाबासाहेब सासणे : मंगळवेढा तालुक्यात नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत भोसे गटातील लढत अत्यंत चुरशीची आणि लक्षवेधी ठरली. या गटात भारतीय...

प्रदीप खांडेकर यांनी घेतले चिंचली मायाक्का देवीचे दर्शन; भोसे गटातील अनेक नेतेमंडळींची उपस्थिती

नंदेश्वर /प्रतिनिधी : भोसे जिल्हा परिषद गटातून भारतीय जनता पक्षाच्या वतीने निवडणूक लढवून विजय मिळवल्यानंतर नवनिर्वाचित सदस्य प्रदीप खांडेकर यांनी चिंचली येथील मायाक्का देवीचे...

नंदेश्वरची सोनाली दोलतडे हिचे एमपीएससीमध्ये उज्ज्वल यश, सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव

नंदेश्वर / प्रतिनिधी : महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत नंदेश्वर गावची भूमिपुत्री सोनाली जगन्नाथ दोलतडे हिने घवघवीत यश संपादन केले आहे....

error: Content is protected !!