Homeराजकीयरड्डे पंचायत समिती गणातून भाजपकडून आकाश डांगे यांची उमेदवारी निश्चित ??

रड्डे पंचायत समिती गणातून भाजपकडून आकाश डांगे यांची उमेदवारी निश्चित ??

रड्डे / विशेष प्रतिनिधी : भोसे जिल्हा परिषद गटातील रड्डे पंचायत समिती गणातून भाजप युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष आकाश डांगे यांना भाजपकडून उमेदवारी मिळण्याची जोरदार शक्यता वर्तवली जात असून, याबाबत चर्चेला वेग आला आहे. सर्वसामान्यांचे नेतृत्व म्हणून ओळख असलेले आकाश डांगे यांना आमदार समाधान आवताडे यांच्या गटाकडून उमेदवारी निश्चित करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

आकाश डांगे यांच्या नावाची शिफारस
आमदार समाधान आवताडे यांनी नुकतीच मंगळवेढा तालुक्यातील आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या होत्या. या मुलाखतींमध्ये रड्डे पंचायत समिती गणातून अनेक इच्छुकांनी आपली बाजू मांडली. मात्र, संघटनात्मक बांधणी, जनसंपर्क, युवकांमध्ये असलेली लोकप्रियता आणि सामाजिक कार्याचा अनुभव या सर्वच बाजूंनी आकाश डांगे सक्षम ठरत असल्याने त्यांचे नाव आघाडीवर असल्याचे बोलले जात आहे. याशिवाय उमेदवारांच्या मुलाखती दरम्यान रड्डे पंचायत समिती गणातील बहुतांश गावातील आ.आवताडे गटाच्या प्रमुख नेत्यांनी आकाश डांगे यांच्या उमेदवारीची शिफारस केली असल्याचीही माहिती मिळत आहे.

सर्वसामान्यांच्या अडीअडचणी सोडविण्यावर भर
गेल्या अनेक महिन्यांपासून आकाश डांगे यांनी रड्डे पंचायत समिती गणातील रड्डे, तसेच गणात समाविष्ट असलेल्या इतर गावांमध्ये सातत्याने संपर्क ठेवला आहे. स्थानिक प्रश्न, शेतकरी, युवक, महिला आणि सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी समजून घेत त्यांनी अनेक ठिकाणी थेट सहभाग घेतल्याचे दिसून येते.

आ. समाधान आवताडे यांचा विश्वासू कार्यकर्ता अशी ओळख
भाजप युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष म्हणून काम करत असताना त्यांनी संघटन वाढीसाठी घेतलेली मेहनत, तसेच आमदार समाधान आवताडे यांच्याशी असलेला घनिष्ठ संपर्क हे देखील त्यांच्या उमेदवारीसाठी महत्त्वाचे घटक मानले जात आहेत. आमदार आवताडे यांच्या विश्वासातील कार्यकर्ता म्हणून आकाश डांगे यांची तालुक्यात ओळख असून, त्यामुळे पक्ष नेतृत्वाकडून त्यांच्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहिले जात असल्याची चर्चा आहे. दरम्यान, उमेदवारीची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नसली तरी रड्डे पंचायत समिती गणात आकाश डांगे यांच्या नावाची चर्चा जोर धरू लागली आहे. जर भाजपकडून त्यांची उमेदवारी जाहीर झाली, तर रड्डे गणातील राजकीय समीकरणे बदलण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. आता सर्वांचे लक्ष भाजपच्या अधिकृत निर्णयाकडे लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मंगळवेढा तालुक्याच्या दुष्काळी भागातील जनतेच्या अस्तित्वावर पुन्हा प्रश्नचिन्ह, पावसाने पाठ फिरवल्याने शेतीसह दुग्ध व्यवसाय...

0
नंदेश्वर / बाबासाहेब सासणे सोलापूर जिल्ह्यासह संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात यंदा पावसाने मोठी दडी मारल्याने ग्रामीण भागात दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. विशेषतः मंगळवेढा तालुक्याच्या...

भैरवनाथाची साखर कारखानदारीनंतर आता दुग्ध व्यवसायात एन्ट्री,भैरवनाथ शुगर उद्योग समूहाचे चेअरमन अनिल सावंत...

0
मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी साखर कारखानदारीच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणारे भैरवनाथ शुगर उद्योग समूहाचे चेअरमन अनिल सावंत आता दुग्ध व्यवसाय...

मंगळवेढा तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; तातडीने उपाययोजना व मदत द्या, बहुजन गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष...

मंगळवेढा / प्रतिनिधी : मंगळवेढा तालुक्यात यंदा पावसाचे अत्यल्प प्रमाण राहिल्याने शेतकरी, शेतमजूर, पशुपालक तसेच सर्वसामान्य नागरिक मोठ्या संकटात सापडले आहेत. तालुक्यात अनेक ठिकाणी...

धनगर समाजाच्या ST आरक्षणासाठी मंगळवेढ्यात तहसीलदारांना निवेदन, आश्वासनाची पूर्तता करून तातडीने निर्णय घेण्याची मागणी;...

मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी धनगर समाजाच्या अनुसूचित जमाती (ST) आरक्षणाची तातडीने अंमलबजावणी करावी, तसेच या प्रश्नावर शासनाने ठोस व निर्णायक भूमिका घ्यावी, या मागणीसाठी सकल...

कै. सौ. इंदुबाई (नानी) दोलतडे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम

नंदेश्वर / प्रतिनिधी : मंगळवेढा तालुका पंचायत समितीच्या माजी उपसभापती तथा दामाजी कारखान्याचे संचालक भिवा दोलतडे यांच्या सुविद्य पत्नी कै.सौ. इंदुबाई (नानी) भिवा दोलतडे...

error: Content is protected !!