जय भवानी नवरात्र महोत्सव मंडळ नंदेश्वरच्या देवी अंबाबाई मंदिराच्या सभा मंडपाचे खासदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते होणार उद्घाटन
सोलापूर आजतक न्यूज नेटवर्क
सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणितीताई शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवेढा तालुक्यातील काँग्रेस पक्षाची जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका संदर्भातील महत्त्वपूर्ण विचारविनिमय बैठक शनिवार, दि. २९ रोजी सायंकाळी ५ वा. पार पडणार आहे. या बैठकीत प्रामुख्याने भोसे जिल्हा परिषद गटातील आगामी निवडणुकांबाबत सखोल चर्चा करण्यात येणार आहे तसेच काँग्रेस पक्षाच्या नूतन पदाधिकाऱ्यांची निवड यावेळी करण्यात येणार असल्याची माहिती काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत साळे व प्रदेश सचिव रविकिरण कोळेकर यांनी दिली.
स्थानिक प्रश्नांवर होणार चर्चा
या बैठकीस मंगळवेढा तालुक्यातील काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असून आगामी निवडणुकांची रणनीती, संघटन बांधणी तसेच स्थानिक पातळीवरील प्रश्नांवर चर्चा होणार आहे.

देवी अंबाबाई मंदिराच्या सभा मंडपाचे होणार उद्घाटन
याचदरम्यान, त्याच दिवशी सायंकाळी ४.३० वाजता नंदेश्वर येथील जय भवानी नवरात्र महोत्सव मंडळ नंदेश्वरच्या देवी अंबाबाई मंदिराच्या सभामंडपाचे उद्घाटन खा. प्रणितीताई शिंदे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. उद्घाटन कार्यक्रमानंतर विचारविनिमय बैठकीत मार्गदर्शन करणार आहेत.























