Homeमहत्त्वाचेमाढा तालुक्यातील रस्त्याच्या कामात कोट्यवधींचा भ्रष्टाचार प्रशासन झोपेत, नागरिकांच्या जीवाशी खेळ!

माढा तालुक्यातील रस्त्याच्या कामात कोट्यवधींचा भ्रष्टाचार प्रशासन झोपेत, नागरिकांच्या जीवाशी खेळ!

माढा | विशेष प्रतिनिधी :
माढा तालुक्यातील आढेगाव–टाकळी–गार–अकोले–आलेगाव खुर्द–रुई–आलेगाव बुद्र–रांजणी ते राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 9 ला जोडणाऱ्या प्र.जि.मा. 128 या महत्त्वाच्या रस्त्याच्या कामात कोट्यवधी रुपयांचा घोटाळा सुरू असल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्ते दादासो बबन कळसाईत यांनी केला आहे. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी डोळे झाकून बसल्याचा संतापजनक प्रकार उघड झाला आहे.सन 2023–24 साठी तब्बल 30 ते 35 कोटी रुपयांचा निधी मंजूर असतानाही आजपर्यंत केवळ निम्मेच काम करण्यात आले आहे. उर्वरित काम मुद्दाम अपूर्ण ठेवून निकृष्ट दर्जाच्या देखभाल-दुरुस्तीच्या नावाखाली निधी लाटण्याचा प्रकार सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे. नवीन काम पूर्ण न करता जुन्याच कामांवर बिलं काढली जात असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे.

रस्त्याच्या कडेला शेतकऱ्यांनी केलेली अतिक्रमणे हटवण्याची साधी तसदीही प्रशासनाने घेतलेली नाही. उलट साईड पट्ट्यावर दगडांचे ढीग टाकून प्रवाशांचा जीव धोक्यात घालण्यात आला आहे. एखादा मोठा अपघात झाला तर त्यास संपूर्णपणे सार्वजनिक बांधकाम विभाग जबाबदार राहील, असा थेट इशारा देण्यात आला आहे. या सर्व प्रकाराविरोधात संबंधित अधिकाऱ्यांना लेखी तक्रार देण्यात आली असून, आधी अपूर्ण राहिलेले काम तातडीने पूर्ण करा, मंजूर निधीची चौकशी करा आणि दोषींवर कारवाई करा, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे.

जर प्रशासनाने तात्काळ दखल घेतली नाही, तर दिनांक 19 जानेवारी 2026 रोजी कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग सोलापूर यांच्या कार्यालयासमोर किंवा टाकळी ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण व तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा थेट संघर्षाचा इशारा देण्यात आला आहे.या आंदोलनाची व तक्रारीची माहिती पोलीस अधीक्षक कार्यालय सोलापूर ग्रामीण, सदर बाजार पोलीस स्टेशन, टेंभुर्णी पोलीस स्टेशन यांनाही देण्यात आली असून, आता अपघात झाला तर प्रशासन जबाबदारी झटकू शकणार नाही, असा संतप्त सूर ग्रामस्थांतून उमटत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नंदेश्वर येथे अवकाळी पावसाचा मोठा फटका; बेदाणे शेडचे नुकसान, वीज पडून गाय दगावली, आ.समाधान...

नंदेश्वर / प्रतिनिधी : मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर परिसरात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकरी व नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अचानक झालेल्या पावसाने द्राक्ष उत्पादनासाठी...

मंगळवेढ्यात आरोग्यसेवेचा नवा आधारवड बेलदार हॉस्पिटल, अल्पावधीतच ठरले विश्वासार्ह

मंगळवेढा / प्रतिनिधी : मंगळवेढा तालुक्यात आरोग्यसेवेच्या क्षेत्रात अल्पावधीतच ठसा उमटवणारे बेलदार हॉस्पिटल सध्या रुग्णांसाठी आशेचा किरण ठरत आहे. उद्घाटनानंतर अवघ्या दोन महिन्यांच्या कालावधीत...

नंदेश्वर व परिसरातील खाद्यप्रेमींसाठी दोस्ती चायनीज सेंटर सेवेत, उद्घाटन सोहळा दिमाखात संपन्न

नंदेश्वर / प्रतिनिधी : नंदेश्वर (ता. मंगळवेढा) येथील खाद्यप्रेमींसाठी आनंदाची बातमी ठरावी, अशा वातावरणात दोस्ती चायनीज सेंटरचे उद्घाटन उत्साहात व मोठ्या थाटामाटात पार पडले....

माळशिरस येथील प्रभू विश्वकर्मा मंदिराच्या जागेवरून वाद चिघळला; लोहार समाज आक्रमक, राज्यभर आंदोलनांची लाट

माळशिरस / प्रतिनिधी : लोहार समाजाचे आराध्य दैवत असलेल्या प्रभु विश्वकर्मा मंदिरासाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या जागेवरून माळशिरस येथे मोठा वाद निर्माण झाला असून,...

बापूसाहेब आडसूळ यांचा लोहार समाज संघटनेच्या वतीने सत्कार

सोलापूर / प्रतिनिधी : एकनाथ स्वाभिमानी शिक्षककर्मचारी पतसंस्थाच्या चेअरमनपदी बापूसाहेब आडसूळ यांची निवड झाल्याबद्दल लोहार समाजाच्या वतीने त्यांचा सत्कार करून अभिनंदन करण्यात आले. समाजातील...

error: Content is protected !!