Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र हादरला! शीर धडावेगळं, शरीराचे 17 तुकडे, थरकाप उडवणारा खून, नवऱ्यानेच बायकोसोबत...

महाराष्ट्र हादरला! शीर धडावेगळं, शरीराचे 17 तुकडे, थरकाप उडवणारा खून, नवऱ्यानेच बायकोसोबत केले कृत्य

(सोलापूर आजतक न्यूज नेटवर्क)
एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे नवऱ्याने आपल्या बायकोच्या शरीराचे तब्बल 17 तुकडे केले आहेत. या निर्घृण खुनाने महाराष्ट्र हादरला आहे. पती-पत्नीचं नातं हे फार पवित्र असतं. एकदा लग्न झाल्यावर हे नातं शेवटपर्यंत टिकवायचं असतं. मात्र क्षुल्लक भांडणामुळे कधीकधी पती-पत्नींचं हे नातं भयानक रुप धारण करू शकतं. असाच एक गंभीर प्रकार भिवंडीमध्ये समोर आला आहे. येथे एका नराधम नवऱ्याने आपल्या पत्नीचा निर्घृण खून केला आहे. त्याने आपल्या पत्नीचं शीर धडावेगळं केलं असून तिचे तब्बल 17 तुकडे केल्याचे समोर आले आहे. या धक्कादायक घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार या प्रकरणातील आरोपीचे नाव ताहा असे आहे. तर मृत महिलेचे नाव शबाना (नाव बदलले आहे) मोहम्मद तारा अंसारी असे आहे. शबानाची हत्या करून ताहाने तिचे शिर धडावेगळे केले तसेच तिच्या शरीराचे तब्बल 17 तुकडे केल्याचे समोर आले आहे. 30 ऑगस्ट रोजी इदगाह रोडजवळ असलेल्या कत्तलखान्याच्या परिसरात एका महिलेचा शीर नसलेला मृतदेह आढळला होता. याप्रकरणाचा तपास करत असताना पोलीस आरोपी ताहापर्यंत पोहोचले आणि या निर्घृण खुनाचा कांड समोर आला.

महिलेच्या शरीराच्या तुकड्यांचा घेतला जातोय शोध
पोलिसांनी ताहाला अटक केली असून त्याची चौकशी चालू आहे. चौकशीदरम्यान ताहाने उडवाउडवीची आणि संशयास्पद अशी उत्तरं दिली त्यानंतर पोलिसांचा त्याच्यावरील संशय बळावला. शबाना यांच्या शरीराच्या इतर तुकड्यांचा शोध घेतला जात आहे. त्यासाठी ड्रोन, अग्निशमन दलाचीही मदत घेतली जात आहे.

ताहाला नेमकं कसं पकडलं?
मिळालेल्या माहितीनुसार शबाना यांच्या आईने पोलिसांत मुलगी हरवल्याची तक्रार दिली होती. दोन दिवसांपासून माझ्या मुलीचा फोन बंद आहे. तसेच माझा जावई ताहा हादेखील फोन उचलत नाहीये, असे या तक्रारीत म्हणण्यात आले होते. त्यानंतर पोलिसांनी इदगाह रोडवर 30 ऑगस्ट रोजी आढळलेल्या धड नसलेल्या डोक्याचा फोटो दाखवला आणि शबाना यांचा खून झाल्याचे समोर आले.भिवंडी येथील भोईवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक रत्नपारखी यांनी या प्रकरणाबाबत सविस्तर माहिती दिली आहे. शबाना यांची हत्या नेमकी कुठे झाली? शबाना यांच्या शरीराचे तुकडे नेमके कुठे आहेत? या सर्व गोष्टींचा शोध घेतला जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला आपल्याला या सर्व्हरवर प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.5C173317.1760029671.77582B9D Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला आपल्याला या सर्व्हरवर प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.5C173317.1760011603.73A91EC7 Source link

अनिल सावंत यांची भैरवनाथ शुगर उद्योग समूहाच्या चेअरमनपदी निवड, तर व्हा.चेअरमनपदी विक्रम सावंत

सोलापूर आजतक न्यूज नेटवर्क.. महाराष्ट्रातील अग्रगण्य आणि नावाजलेल्या औद्योगिक समूहांपैकी एक असलेल्या भैरवनाथ शुगर उद्योग समूहाच्या चेअरमनपदी अनिल सावंत यांची नुकतीच निवड करण्यात आली...

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला आपल्याला या सर्व्हरवर प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.5C173317.1759993546.70F737A1 Source link

जयसिंग माऊली पतसंस्थेचा उद्घाटन सोहळा उत्साहात,पतसंस्था आर्थिक मदत करणाऱ्या संस्था नसून सामाजिक व आर्थिक...

सोलापूर आजतक न्यूज नेटवर्क.. ग्रामीण भागात पतसंस्थांचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत असून, त्या केवळ आर्थिक मदत करणाऱ्या संस्था नसून सामाजिक व आर्थिक विकासाच्या केंद्रबिंदू ठरत आहेत....

error: Content is protected !!