(सोलापूर आजतक न्यूज नेटवर्क)
सोलापूर जिल्ह्यात सध्या सुरु असलेल्या अतिवृष्टीमुळे अनेक भागांमध्ये पुरस्थिती निर्माण झाली आहे. हजारो कुटुंबांचे संसार उघड्यावर आले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. या संकटाच्या काळात नंदेश्वर (ता. मंगळवेढा) येथील हिराबाई डांगे या लाडक्या बहिणीने आपल्या अनोख्या दातृत्वातून मदतीचा हात पुढे केला आहे.
धनादेश आ.आवताडे यांच्याकडे सुपूर्द…
मंगला डांगे यांनी आपल्या लाडक्या बहिणीचे दहा महिन्यांचे मानधन मुख्यमंत्री सहायता निधीत जमा केले आहे. रकमेचा धनादेश आमदार समाधान आवताडे यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी माजी सभापती प्रदीप खांडेकर, माजी जिल्हा परिषद सदस्य नामदेव जानकर, शिवसेना तालुकाप्रमुख अशोक चौंडे, माऊली विकास सेवा सोसायटीचे चेअरमन भारत गरंडे, युवक नेते दत्ता साबणे, हे यावेळी उपस्थित होते. हिराबाई डांगे यांच्या या स्तुत्य कार्याचे मोठ्या प्रमाणावर कौतुक होत आहे. हिराबाई डांगे या भारतीय जनता युवा मोर्चा मंगळवेढा तालुकाध्यक्ष आकाश डांगे यांच्या मातोश्री आहेत.
लाडक्या बहिणी पुढे येणे गरजेचे..
आमदार समाधान आवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करण्यात आली आहे. या अनोख्या दातृत्वामुळे हिराबाई डांगे या जिल्ह्याच्या “लाडक्या बहिणी” म्हणून पुढे आल्या आहे.पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सर्वसामान्यांनी पुढे येण्याची गरज असताना, हिराबाई डांगे यांचं हे पाऊल प्रेरणादायी ठरत आहे. संकटाच्या काळात माणुसकीचं हे दर्शन निश्चितच उजळवणारे आहे.
