Homeसामाजिकशाम गोगाव आणि आदित्य फत्तेपुरकर मित्र मंडळाचा उपक्रम, नवीन वर्षाचे स्वागत व...

शाम गोगाव आणि आदित्य फत्तेपुरकर मित्र मंडळाचा उपक्रम, नवीन वर्षाचे स्वागत व रक्तदानाने सरत्या वर्षाला निरोप

१२१ रक्तदात्यांनी रक्तदान करत केला थर्टी फस्ट साजरा
पंढरपूर / तालुका प्रतिनिधी – सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाचे स्वागत पंढरपुरात विधायक पद्धतीने करण्यात आले. तब्बल १२१ रक्तदात्यांनी रक्तदान करून थर्टी फर्स्ट साजरा करत नवीन वर्षाचे स्वागत केले. शाम गोगाव आणि आदित्य फत्तेपुरकर मित्रपरिवाराच्या वतीने गेल्या २१ वर्षापासून रक्तदानाची चळवळ थर्टी फर्स्ट रोजी चालवली जाते.

श्याम गोगाव आणि माजी नगरसेवक आदित्य फत्तेपूरकर यांच्या एन आय टी मित्र परिवाराच्या वतीने प्रतिवर्षी थर्टी फर्स्ट रोजी रक्तदान शिबिर आयोजित केले जाते. यंदाच्याही वर्षी थर्टी फर्स्ट रोजी सकाळी नऊ वाजले पासून रक्तदात्यांनी रक्तदान करण्यासाठी गर्दी केली. तब्बल १२१ रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. यावेळी रक्तदात्यांना प्रमाणपत्रासह भेट देण्यात आली.

रक्तदान केल्यानंतर वैद्यकीय सल्ल्यानुसार पुढील ४८ तास कुठल्याही प्रकारचे व्यसन अथवा मद्य घेता येत नाही. त्यामुळे थर्टी फर्स्ट रोजी पार्टी , डीजे , अशा गोष्टींना फाटा देत विधायक पद्धतीने व्यसनमुक्त पिढी घडवण्याचा संकल्प श्याम गोगाव आणि आदित्य फत्तेपूरकर मित्र परिवाराच्या वतीने करण्यात येत आहे. विशेष म्हणजे सलग गेल्या २१ वर्षापासून थर्टी फर्स्ट रोजी रक्तदानाची ही चळवळ अव्याहातपणे सुरू आहे.

या रक्तदान शिबिराचे उद्घाटन मनसे नेते दिलीप धोत्रे युवक नेते श्री भगीरथ भालके, यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर दिवसभरात शतक वीर रक्तदाते श्री रवींद्र भिंगे ,शशिकांत दुनाखे ,रवी लवेकर राष्ट्रवादीचे सुधीर भोसले , सौदागर मोलक , एम. पाटील, दत्ता धोत्रे , राजेंद्र खोबरे काँग्रेसचे माजी अध्यक्ष अमर सूर्यवंशी , नितीन सरडे ,यांच्या आदी मान्यवरांनी भेटी दिल्या.तसेच दिवसभरात विविध सामाजिक , राजकीय क्षेत्रातील मंडळीनी या शिबिरास भेटी देऊन रक्तदात्यांचा उत्साह वाढवला.

हे रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी सर्वश्री श्याम गोगाव, आदित्य फत्तेपूरकर, विठ्ठल कदम, बाहुबली गांधी ,महेंद्र जोशी ,धनंजय मनमाडकर, सत्यवान दहिवाडकर, गणेश पिंपळनेरकर, अशोक भुसे ,अमित करंडे, गणेश जाधव, , संकेत कुलकर्णी, अमोल आटकळे, संतोष शिरगिरे, दत्ता पवार,महेश भोसले ,काशिनाथ गोगाव विशाल पावले आदी मित्रमंडळींनी परिश्रम घेतले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

गुरुदेव स्वामी यांना आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार जाहीर, सर्व स्तरातून अभिनंदनचा वर्षाव

मंगळवेढा / तालुका प्रतिनिधी : श्री संत चोखोबा शिक्षण प्रसारक मंडळ, हुन्नूर संचलित माध्यमिक आश्रम शाळा, हुन्नूर येथील कर्तव्यदक्ष मुख्याध्यापक गुरुदेव काशिनाथ स्वामी यांना...

एकत्र आलो तर ताकद वाढते.. भगीरथ भालके आणि अनिल सावंतांच्या युतीची मंगळवेढा तालुक्यात चर्चा.....

सोलापूर आजतक स्पेशल✍️✍️✍️ मंगळवेढा तालुक्यात आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना सध्या वेग आला असून, विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन...

सामाजिक कार्यात अग्रेसर असणारा प्रेरणा परिवार करणार राजकारणात प्रवेश, प्रेरणा उद्योग समूहाचे मालक बाळासाहेब...

नंदेश्वर / विशेष प्रतिनिधी : सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात सातत्याने कार्यरत असलेला प्रेरणा परिवार आता थेट राजकारणात प्रवेश करणार असल्याची महत्त्वपूर्ण माहिती प्रेरणा उद्योग समूहाचे...

चिनी बेदाण्याच्या विरोधात पंढरपूर तालुक्यातील शेतकरी आक्रमक, संबंधित आडतदार, व्यापारी, दलाल यांच्यावर कारवाई करण्याची...

पंढरपूर/तालुका प्रतिनिधी : चीन मधून येणाऱ्या निकृष्ट बेदाण्याची विक्री राज्यात होत असल्याने शेतकरी धास्तावले असून अशी विक्री करणाऱ्या आडतदार, व्यापारी, दलाल यांच्यावर कारवाई करावी,...

जिल्हा परिषद निवडणूक कधी जाहीर होणार? राज्य निवडणूक आयोगाकडून मोठी अपडेट

सोलापूर आजतक न्यूज नेटवर्क : राज्यभरातील २९ महापालिकांच्या रणधुमाळी सुरू असतानाच आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांच्याही तयारीला सुरुवात झाली आहे. दोन्ही स्थानिक...

error: Content is protected !!