न्यूज
नंदेश्वर (ता. मंगळवेढा) येथील जिल्हा परिषद केंद्र शाळेला गोणेवाडी (ता. मंगळवेढा) येथील सामाजिक कार्यकर्ते अजित हजारे यांनी अत्यंत उत्कृष्ट दर्जाचा प्रिंटर भेट दिला. त्यांच्या या दातृत्वाचे शालेय व्यवस्थापन समिती, शिक्षकवृंद तसेच नंदेश्वर ग्रामस्थांनी मनःपूर्वक स्वागत केले. यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बाबासाहेब सासणे, माजी अध्यक्ष गुरुलिंग दोलतडे, उपाध्यक्ष पोपट बंडगर, मुख्याध्यापक प्रदीप पाटील यांचेसह सहशिक्षक अशोक मासाळ, बाळासाहेब मासाळ, दादासाहेब इंगोले, पोपट हजारे, सचिन लाळे, गवळी हे उपस्थित होते.
अजित हजारे यांचे दातृत्व कौतुकास पात्र – गुरुलिंग दोलतडे
या कार्यक्रमावेळी बोलताना शालेय व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष गुरुलिंग दोलतडे म्हणाले की, अजित हजारे हे नंदेश्वर येथील जिल्हा परिषद केंद्र शाळेचे सहशिक्षक रघुनाथ हजारे यांचे सुपुत्र आहेत. एका शिक्षकाची शिक्षणाविषयीची तळमळ त्यांच्या कुटुंबापर्यंत पोहोचल्याचे हे दातृत्व दाखवते. नंदेश्वर येथील जिल्हा परिषद केंद्र शाळेच्या इतिहासात सर्वात मोठी मदत दिली यामुळे अजित हजारे हे कौतुकास पात्र तर आहेतच याशिवाय त्यांचे आभार मानावे तितके थोडे असल्याचेही यावेळी बोलताना दोलतडे म्हणाले.
ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळा सक्षम, गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यास समर्थ – अजित हजारे























